नागपूर- महानगरपालिकेत प्रभाग पद्धतीने सदस्य निवडले जातात. सध्या चार सदस्य निवडून दिलें जातात. यात एकापेक्षा जास्त सदस्य असल्याने मतभेद असल्यास अनेक अडचणी येत आहे. यामुळे एक सदस्य एक वार्ड ही जुनी पद्धत पुन्हा लागू करावी. यासाठी महाराष्ट्र १९ महानगरपालिका २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४८ विधेयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दोन तासात एखादा षटकार किंवा चौकार तरी मारावा; बच्चू कडूंचा सरकारला टोला
या विधेयकाला विरोधी पक्षांतून आमदार अनिल सोले, गिरीश व्यास, माजी राज्यमंत्री रणजित पाटील तसेच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी विरोध केला. यात महानगरपालिकेवर सध्या मोठ्या प्रमाणात भाजपचे सरकार असल्याने हे बदल केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. हे सांगताना २००२ ला आघाडी शासनाने तीन सदस्यीय प्रणाली काढली. २००७ मध्ये पुन्हा एक सदस्य प्रणाली निर्माण करण्यात आली होती. २०१२ मध्ये दोन सदस्यप्रणाली निर्माण करण्यात आली होती. आता पुन्हा एका वार्डात एक सदस्य पद्धत जाणीवपूर्वक करत आहेत. येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुका पाहून हे विधेयक मांडण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा- पूर्वी घरांमध्ये मुलींची पूजा केली जायची, मात्र आता महिला सुरक्षित नाहीत - राज्यपाल
यात नगरपालिकेच्या सदस्यांसोबत चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होते. आता वार्ड पुन्हा फोडताना अनेक अडचणी येतील, असेही म्हटले जात आहे. यासह अनके बाबी मांडत विधेयकाला विरोध करण्यात आला. मात्र, बहुमत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याने सभापतींनी विधेयक दुरुस्तीला मंजुरी दिली.