नागपूर - आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ येते आहे. बाप्पाला सन्मानपूर्वक निरोप देण्याकरिता नागपूर महानगर पालिका सज्ज झाली आहे. बाप्पाचे विसर्जन कृत्रिम टँकमध्येच करण्यात यावे, असा नियम लागू झाला आहे. त्यामुळे गणेश भक्तांना टँक शोधण्यात अडचण येऊ नये, या करिता महापालिकेने मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती केली आहे. या अप्लिकेशनच्या माध्यमातून एका क्लिकवर कृत्रिम टँकचे लोकेशन
हेही वाचा - आघाडीतही 'इनकमिंग'...भाजपचे माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश?
गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही आणि जलस्रोत प्रदूषित होणार नाही याची खबरदारी गणेशभक्तांनी घेतलेली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करताना ते महानगर पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम टँकमध्येच करायचे असल्याने गणेश भक्तांना या संदर्भात अधिक माहिती मिळावी या करिता प्रयत्न केले जात आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून नागपूर महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने एक मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे. मोरया नावाच्या या मोबाईल अप्लिकेशनच्या मदतीने गणेशभक्त आपल्या परिसरात विसर्जनाच्या कृत्रिम टँक कुठे कुठे ठेवण्यात आल्या आहेत याचा शोध घेऊ शकणार आहेत.
हेही वाचा - नागपूरमध्ये 'झिरो डिग्री'वर गुन्हे शाखेची कारवाई, मालकाविरोधात गुन्हा दाखल
शहरातील फुटाळा तलाव वगळता इतर कोणत्याही तलावात बाप्पाचे विसर्जन करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मनपाने गणेश भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी केलेली उपाय योजना प्रभावी ठरत आहे. नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाणीपुरवठा सभापती विजय (पिंटू) झलके यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - अजबच.. चोरांना मिळतो 'मासिक पगार'.. नागपूरमध्ये पगारी चोरांची टोळी गजाआड