ETV Bharat / city

Untimely Rain : एसडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाईल - विजय वडेट्टीवार - अवकाळी पाऊस आणि गारपिट नुकसान

नुकसानग्रस्त भागाचे जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत उपलब्ध करता येईल, या उद्देशाने लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

मंत्री विजय वडेट्टीवार
मंत्री विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Jan 13, 2022, 9:13 PM IST

Updated : Jan 13, 2022, 9:23 PM IST

नागपूर - विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे ( Untimely Rain and Hail ) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या निकषानुसार मदत ( As Per SDRF Criteria Help To Farmers ) केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Minister Vijay Vadettiwar ) यांनी दिली आहे. ते आज (गुरुवारी) नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. या संदर्भात नुकसानग्रस्त भागाचे जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत उपलब्ध करता येईल, या उद्देशाने लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

प्रतिक्रिया देतांना मंत्री विजय वडेट्टीवार
  • 'मुंबई बाहेर कोरोना संसर्ग वाढत आहे'

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ नोंदवून आली आहे. विशेषतः मुंबई बाहेर कोरोना संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या देखील वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यात निर्बंध कायम राहतील, असे कॅबिनेटमध्ये ठरले असून मुख्यमंत्री देखील सकारात्मक असल्याचे देखील वडेट्टीवार म्हणाले.

  • 'गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्यास विरोध'

गडचिरोलीत असलेल्या हत्तीच्या कळपातील तीन हत्ती अंबानी यांच्या प्राणिसंग्रहालयात पाठवण्याला मी विरोध केला असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. पर्यटन वाढवण्यासाठी हत्ती असलेल्या क्षेत्राचा विकास करणयासाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Untimely Rain Vidarbha : विदर्भाला अवकाळीचा फटका, पाहा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...

Last Updated : Jan 13, 2022, 9:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.