ETV Bharat / city

Bawankule Vs Mangesh Deshmukh : पराभूत उमेदवार मंगेश देशमुखांच्या मनात बावनकुळेंविरुद्ध आहे राग, द्वेश आणि चीड.. जाणून घ्या कारण - महानिर्मिती कंपनी फायरमॅन

नुकतीच विधानपरिषदेची निवडणूक (MLC Election 2021) झाली. त्यात नागपुरातून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (BJP Candidate Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh Congress) यांचा पराभव केला. बावनकुळे यांच्या घराजवळच राहणाऱ्या देशमुख यांच्या मनात बावनकुळेंच्या विरुद्ध प्रचंड, राग द्वेष आणि चीड आहे. याचे नेमके कारण काय आहे? चला तर मग जाणून घेऊयात..

मंगेश देशमुख
मंगेश देशमुख
author img

By

Published : Dec 15, 2021, 11:12 AM IST

नागपूर - विधानपरिषद निवडणूक (MLC Election 2021) भाजपचे हेवीवेट उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (BJP Candidate Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस समर्थीत उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh Congress) यांना १७६ मतांच्या फरकाने पराभूत केले आहे. चार दिवसांपूर्वी मंगेश देशमुख कोण आहेत (Who Is Mangesh Deshmukh), कोणत्या पक्षाचे नगरसेवक आहेत, याबद्दल कोराडीतील नागरिकांच्या शिवाय इतर कुणालाही त्यांच्याबद्दल फारसी माहिती नव्हती. काँग्रेसने आपले अधिकृत उमेदवार डॉ रवींद्र (छोटू) भोयर (Congress Candidate Ravindra Bhoyar) यांना बाजूला सारून मंगेश देशमुख यांच्यावर डाव खेळल्याने, अचानक मंगेश देशमुख हे चर्चेत आले आहेत. देशमुख यांनी तब्बल १८६ मत घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानाजवळ राहणारे मंगेश देशमुखांच्या मनात बावनकुळे विरुद्ध प्रचंड राग, द्वेश आणि चीड आहे. त्यामुळेच त्यांनी बावनकुळेंच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. बावनकुळे आणि मंगेश यांच्यांत असे काय घडलं की, मंगेश यांना बावनकुळेंच्या विरोधात निवडणूक लढण्याचा प्रण करावा लागला? हे जाणून घेऊ या..

पराभूत उमेदवार मंगेश देशमुखांच्या मनात बावनकुळेंविरुद्ध आहे राग, द्वेश आणि चीड.. जाणून घ्या कारण
बावनकुळेंमुळे गमावली नोकरी

आज सर्वत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाचीच चर्चा असली तरी, सुरुवातीला अपक्ष आणि नंतर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेले मंगेश देशमुख यांनी बावनकुळे यांच्यासमोर सादर केलेल्या आव्हानाचीही चर्चा कमी नाही. बावनकुळे यांच्यामुळे नोकरी गमवावी लागल्याचा राग मंगेश यांच्या मनात आहे. स्वकर्तुत्वाने मिळवलेली नोकरी बावनकुळे यांच्या विरोधामुळे गेली. त्यामुळे मंगेश यांच्या मनात बावनकुळे यांच्या बद्दल प्रचंड चीड, राग आणि द्वेष भावना निर्माण झाली होती. राजकीय किंवा वैयक्तिक वैर नसताना सुद्धा बावनकुळे यांनी खुन्नस काढण्यासाठी माझी नोकरी हिरावल्याचा आरोप मंगेश देशमुख यांनी केला आहे.

ग्रामपंचायत सदस्य असताना मिळवली नोकरी
मंगेश देशमुख यांनी २०१० साली पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा. हळूहळू राजकारण शिकत असताना २०१२ साली वीज महानिर्मिती कंपनीने फायरमॅनच्या (Maha Nirmiti Fireman Vacancy) जागा भरण्यासाठी जाहिरात काढली होती. मी रीतसर परीक्षा देऊन नोकरी मिळवली. २०१३ मध्ये मला चंद्रपूरमध्ये नेमणूक देण्यात आली. मात्र नोकरीवर लागल्याच्या दोन महिन्यातच मला नोकरीवरून काढण्यात आले. यासाठी सर्वस्वी चंद्रशेखर बावनकुळे हेच जबाबदार होते, असा आरोप मंगेश देशमुख यांनी केला आहे.

भविष्यात बावनकुळेंच्या विरोधात पुन्हा लढणार
भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत विधान परिषदेत एन्ट्री मिळवली आहे. त्यांनी काँग्रेस समर्थीत उमेदवार मंगेश देशमुख यांना १७६ मतांनी पराभूत केले असले तरी, भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत बावनकुळे यांच्या विरुद्ध लढण्याची तयारी असल्याचे मंगेश देशमुख म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.