नागपूर - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी शहरातील संचारबंदीचा घेतला आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन परिस्थिती जाणून घेतली.
नागपूर शहरात लॉक डाऊनला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिक शासन आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करत आहे. सगळ्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. जे नागरिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत नाही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. मात्र, नागपूरकर चांगला प्रतिसाद देत असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यावेळी म्हणाले.