नागपूर - मानकापूर परिसरात २४ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. एलेक्ससिस रुग्णलया जवळील राज पॅलेस इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेतली.
24 वर्षीय अंकिता माकोडे असं या तरुणीचं नाव आहे. मानकापूर भागात ही तरुणी आणि तिचा मित्र २५ वर्षीय सौरभ वसुले यांची आज दुपारी भेट झाली. भेटी दरम्यान दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. त्यामुळं तरुणीने रागाच्या भरात इमारतीवरून उडी मारली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
प्रेम प्रकरणातून किंवा एकतर्फी प्रेमातून तिने आत्महत्या केली का? या प्रश्नाच्या उत्तरांचा शोध पोलीस घेत आहेत. या आत्महत्ये मुळं तरुणीच्या कुटुंबियांवर मोठा आघात झालाय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करताहेत.