ETV Bharat / city

दारुड्या मुलाच्या जाचाला कंटाळून वृद्ध बापानी केली मुलाची हत्या; नागपुरातील हुडकेश्वरमधील घटना - father murdered

दारुड्या मुलाच्या जाचाला कंटाळून वृद्ध वडिलांनी कुऱ्हाडीने घाव घालून मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे.

मृत संजय बाळापुरे
author img

By

Published : Jul 18, 2019, 4:31 PM IST

नागपूर - दारुड्या मुलाच्या जाचाला कंटाळून वृद्ध वडिलांनी कुऱहाडीने घाव घालून मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे. मानेवाडाच्या अलंकार नगर येथे ही घटना घडली. त्या वृद्ध वडिलांनी स्वत: पोलीस ठाण्यात जावून आत्मसमर्पण केले आहे.

दारुड्या मुलाच्या जाचाला कंटाळून वृद्ध बापानी केली हत्या

संजय बाळापुरे असे मृत मुलाचे नाव आहे. तर दामोदर बाळापुरे असे आरोपी वृद्धाचे नावे आहे. संजय दामोदर बाळापुरे याने 5 वर्षापूर्वी स्वतःच्या सासऱ्याची हत्या केली होती. त्या गुन्ह्याची शिक्षा भोगून तो नुकताच कारागृहाबाहेर आला होता. तुरुंगातून मुक्तता झाल्यावर तो काही दिवस व्यवस्थित राहत होता. मात्र नंतर त्याला दारूचे व्यसन जडले. दारू पिल्यानंतर संजय कुणाचेही ऐकत नसे. तसेच तो आई वडिलांसोबत स्वतःच्या मुलालाही मारहाण करत होता. संजयच्या या कृत्याने त्याचे कुटूंबिय अस्वस्थ असायचे.

घटनेच्या वेळी सुद्धा मृतक संजय हा दारू ढोसून आला होता. त्याने वडिलांकडे पैशाची मागणी केली. मात्र वडिलांनी त्यांच्या मागणीला भीक न घातल्याने संतापलेल्या संजयने वडिलांशी वाद घातला. त्यावेळी त्याने सकाळी पैसे न दिल्यास दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यांचा वाद इतका विकोपाला गेला की स्वतःचा जीव गमावण्याच्या भीतीने वृद्ध दामोदर बाळापुरे यांनी स्वतःचा मुलाच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली. त्यानंतर दामोदर हे स्वतःच हुडकेश्वर पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले. त्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

Intro:नागपूर शहराच्या हुडकेश्वर पुलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मानेवाडाच्या अलंकार नगर येथे एका वृद्धाने स्वतःच्याच मुलाची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे....संजय बाळापुरे असे मृतकांचे नाव आहे,तर दामोदर बाळापुरे असे आरोपी वृद्धाचे नावे आहे....मुलाची हत्या केल्यानंतर दामोदर बाळापुरे यांनी हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलंयBody:मृतक संजय दामोदर बाळापुरे याने 5 वर्षा पूर्वी स्वतःच्या सासर्याची हत्या केली होती....त्या गुन्ह्याची शिक्षा भोगून तो नुकताच कारागृहा बाहेर आला होता....तुरुंगातून मुक्तता झाल्या तो काही दिवस व्यवस्थित राहत असताना त्याला दारूचे व्यसन जडले होते...दारू पिल्यानंतर संजय हैवान व्हायचा....तो आई वडिलांसोबत च स्वतःच्या मुलाला मारहाण करत होता...घटनेच्या वेळी सुद्धा मृतक संजय हा दारू ढोसून आला होता,त्याने वडिलांकडे पैशाची मागणी केली,मात्र वडिलांनी त्यांच्या मागणीला भीक न घातल्याने संतापलेल्या संजय ने वडिलांशी वाद घातला,त्यावेळी त्याने सकाळी पैसे न दिल्यास दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती...त्यांचा वाद इतका विकोपाला गेला की स्वतःचा जीव गमावण्याच्या भीतीने वृद्ध दामोदर बाळापुरे यांनी स्वतःचा मुलगा संजयच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली....त्यानंतर दामोदर हे स्वतःचा सकाळी हुडकेश्वर पुलिस स्टेशनला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी स्वतः केलेल्या गुन्ह्याची कबुली देत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले....त्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी पाठवला आहे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.