नागपूर - अवकाळी पाऊस आणि शेतीच्या संकटामुळे मागील ११ महिन्यात नागपूर विभागात २१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेती अधिक महाग झाली आहे. पेरणीपासून पीक कापेपर्यंत एकरी १० ते २० हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना येतो, पण मोबदला मिळत नाही. याचे महत्वाचे कारण पिकांना योग्य हमीभाव नाही, असे शेतकरी नेते सांगत आहेत.
हेही वाचा... #HBDKapilDev : क्रिकेटच्या कारकिर्दीत कधीही 'रनआऊट' न झालेला क्रिकेटपटू
त्यामुळे उत्पादनातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा उत्पादनासाठीचा खर्च अधिक आहे. शैक्षणिक खर्च वैद्यकीय खर्च, यासाठीही शेतकरी कर्ज घेतात. त्यातही सततचे अस्मानी संकट, यातूनच ३३५ दिवसांत २१६ शेतकऱ्यांनी आर्थिक संकटामुळे जीवन संपवले आहे.
हेही वाचा... जेएनयू हिंसाचार : स्वरा भास्कर, तापसी पन्नुसह बॉलिवूडकरांचा संताप
मागील ११ महिन्यात वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही ५३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. तर, नागपूर जिल्ह्यात ४८ शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे. यात २१६ पैकी १४२ शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली नाही. जे शेतकरी जगू शकत नाहीत, ते आपले जीवन संपवण्याचा मार्ग निवडत आहेत. जे जीवन जगत आहेत आणि आत्महत्या करत नाहीत. त्यांची देखील परिस्थिती बिकट आहे, असे मत शेतकरी नेते विजय जावंदीया यांनी व्यक्त केले.