ETV Bharat / city

नागपुरात पोलीस आयुक्तांच्याच नावाने फेक फेसबुक अकाउंट; गुन्हेगाराने केली पैशांची मागणी - nagpur news

गेल्या काही वर्षात राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात फसवणूकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. मोठ्या रक्कमेचे बक्षीस देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या घटना वाढत असताना आता प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने फेक अकाउंट तयार करत अनेकांकडे पैशाची मागणी करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक चित्र
प्रतिकात्मक चित्र
author img

By

Published : Aug 9, 2021, 5:50 PM IST

Updated : Aug 9, 2021, 6:51 PM IST

नागपूर - नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट तयार करून लोकांकडे पैशाची मागणी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष रुपेश पन्नासे यांना फेसबुक मॅसेंजरद्वारे पैशाची मागणी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या नावाने कुणीतरी फेक अकाउंट तयार केले असल्याचा संशय रुपेश पन्नासे यांना आल्याने त्यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोनकरून या संदर्भात विचारणा केली असता, हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस आयुक्तांनी फेक अकाउंट ब्लॉक करत सायबर सेलला चौकशीचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष रुपेश पन्नासे
नागपुरात सायबर गुन्हेगारांचे धाडस वाढले?

गेल्या काही वर्षात राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात फसवणूकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. मोठ्या रक्कमेचे बक्षीस देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या घटना वाढत असताना आता प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने फेक अकाउंट तयार करत अनेकांकडे पैशाची मागणी करण्यात आली आहे. हा फसवणुक कारण्याचा नवीन फंडा सायबर गुन्हेगारांचा शोधून काढला आहे.

Last Updated : Aug 9, 2021, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.