नागपूर - त्रिपुरामध्ये कुठलीही घटना घडली नसताना कपोल कल्पित माहितीच्या आधारे अमरावतीमध्ये मोर्चे काढून हिंदूंच्या दुकानांत तोडफोड करण्यात आली (amravati violence), त्यावर हे तथाकथित सेक्युलर नेता का बोलत नाही? असा प्रश्न राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपने दंगे घडवल्याचा आरोपाला उत्तर दिले आहे. प्रश्न काय आहे आणि तो कोणी निर्माण केला यापासून दूर भटकून भाजपवर आरोप केल्याने असे प्रश्न कधी सुटणार नाही, असेही फडणवीस म्हणाले. ते नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - VIDEO नाशिकात भुजबळ, राऊत आणि चंद्रकांत पाटील एकाच सोफ्यावर; राजकीय चर्चांना उधान
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भाच्या दौऱ्यावर येऊन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh case) यांची पाठराखण केली. भाजपच्या हातातून सत्ता गेल्याने अशा पद्धतीने कारवाया करत असल्याची टीका पवार यांनी केली होती. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाची जी अवस्था झालेली आहे, त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष म्हणून पाठराखण करण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागेल. अनिल देशमुखांचे पवारांकडून समर्थन करणे अपेक्षित नव्हते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यानी सोयाबीन पेंड आयात थांबावी या मागणीसाठी आंदोलन केले होते. यात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सोयाबीनची आयात थांबवली आहे. यापूर्वी जे काही आयातीचे ऑर्डर होते तेच येणार आहे. भारतात सोयाबीन पेंडचे दर 11 हजार पर्यंत पोहोचल्याने जे मोठे कॅटल फीड आणि पोल्ट्री करणारा शेतकरी आहे त्यांना सुद्धा सोयाबीन पेंड आयात करून दर नियंत्रणात आणण्याची मागणी करण्यात आली होती. पण, केंद्र सरकारच्या सोयाबीन पेंडचे भाव कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर आयात थांबवली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यापूर्वी दिली होती, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणालेत.
हेही वाचा - Sharad Pawar Vidarbha Visit : 'या' कारणामुळे शरद पवारांचा यवतमाळ आणि वर्धा दौरा रद्द