नागपूर - नागपुरात सीएनजी दर विक्रमी उंचीवर पोहचले ( CNG Rate Hike In Nagpur ) आहेत. आज (8 मार्च) नागपुरात सीएनजी 120 रुपये प्रति किलोच्या दराने मिळत आहे. चार दिवसापूर्वीपर्यंत सीएनजी शंभर रुपये प्रति किलो दराने मिळत असताना चार दिवसात 20 टक्क्यांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी आधारित वाहन चालवनाऱ्याच्या खिशाला चाप बसला अससून बजेट बिघडले आहे. यामुळे सीएनजी इंधनधारक, वाहक संताप व्यक्त करत आहे.
इतर शहरातील आणि नागपुरातील किमती फरक -
पेट्रोल वाहनांना कमी खर्चात प्रदूषण मुक्त पर्याय म्हणून अनेक CNG वाहन धारकांनी महागाची कार घेतल्या आहेत. मात्र हा पर्याय निवडण्यात चूक तर झाली नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर काहींनी मुंबई आणि पुण्यामध्ये नागपूरपेक्षा अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे. मग सीएनजी नागपुरात एवढी महाग का झाला असा प्रश्न पडला आहे. मुंबई, पुणेसह इतर शहरात सीएनजी 65 ते 75 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असताना तीच सीएनजी नागपुरात 120 रुपये प्रति किलो का असा वाहन चालकांचा सवाल आहे.
एलनजीचे सीएनजी रूपांतर करण्याचा खर्चात वाढ -
नागपुरात सीएनजी चापुरवठा करणारे तीनच पंप असून ते रॉमेट या कंपनीच्या मालकीचे आहेत. तिन्ही ठिकाणी सीएनजीचा आजचा दर 120 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला आहे. इतर शहरात सीएनजी पुरवठ्यासाठी पाईपलाईन असून नागपुरात पाईपलाईन नाही. त्यामुळे नागपुरात एलएनजीला आणून सीएनजीमध्ये रूपांतरित करावे लागते. हा रूपांतरित करण्यासाठीचा खर्चही अधिक आहे. नागपुरात गुजरात मधील दहेज मधून एलएनजी आणले जाते. पण युद्धजन्य परिस्थिती मुळे एलएनजीचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढला वाढला आहे. यासोबतच गुजरातमधून नागपूर पर्यंत एलएनजी वाहून आणण्याचा खर्चही वाढला आहे.
नागपुरात सीएनजीसाठी पाईपलाईन किंवा सबसिडीची गरज -
नागपुरात पहिला सीएनजी पंप हा 2019 मध्ये सुरू झाला. पण वाहनांची संख्या मागणी पाहता शहारात आजच्या घडीला तीन पंप आहे. यातच या खाजगी कंपनी असल्याने यात सरकारची कुठलीही सबसीडी नसल्याने अगोदरच इतर मोठ्या शहाराच्या तुलनेत नागपुरात सीएनजी महाग विकला जातो. त्यामुळे सीएनजी पाईपलाईन टाकल्यास या दारात घट होऊ शकते. पण आजच्या घडीला शहरात अनेक तीन चाकी रिक्षा हे सिएनजी वर धावत असल्याने त्यांचे भाड्यात सुद्धा वाढ होऊन अप्रत्यक्षपणे नागपूरकाच्या खिशाला चांगलीच चाप बसणार आहे.
हेही वाचा - Aditya Thackeray : केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी म्हणजे दिल्लीचे महाराष्ट्रावर आक्रमण -आदित्य ठाकरे