नागपूर कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी (land scam) जबलपूरचे बिशप पीसी सिंग (bishop pc singh) यांना नागपूरच्या विमानतळावरून अटक करण्यात (bishop PC Singh arrested from Nagpur airport) आली आहे. मध्यप्रदेशच्या जबलपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने (jabalpur EOW) बिशप पीसी सिंग यांना अटक केली असून त्यांना जबलपूर येथे नेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिशप पीसी सिंग हे जर्मनीहून भारतात दाखल होताचं आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना नागपूरच्या विमानतळावरून ताब्यात घेतले आहे.
प्रकरण असे की मध्यप्रदेश पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखा (EOW) यासह अनेक केंद्रीय तपासयंत्रणांनी चर्च ऑफ नॉर्थ इंडिया (CNI) मॉडरेटर बिशप पीसी सिंग यांच्या विरोधात तपासाचा फास आवळला आहे. बिशप सिंह (Bishop PC Singh) आणि रियाझ भाटी (Riyaz Bhati) यांच्यात एक व्यवहार झाला होता. ज्यांचे धागेदोरे मुंबई अंडरवर्ल्डशी जोडले जात आहेत. रियाझ भाटी हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे. मध्य प्रदेश EOW आर्थिक गुन्हे शाखेने 8 सप्टेंबर रोजी बिशप सिंह यांच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली होती. त्यावेळी छाप्यात परकीय चलनासह सुमारे 2 कोटी रुपये सापडले होते.
बिहारमध्ये जन्मलेले बिशप हे सध्या सीएनआयचे प्रमुख आहेत. देशभरातून एकूण 27 बिशपाधिकारी त्यांच्याअंतर्गत येतात, जबलपूर त्यापैकी एक आहे. जबलपूर, कटनी, सिवनी, दमोह आणि छिंदवाडा येथे एकूण पंधरा शाळा सुरू आहेत. जबलपूरमध्ये मुली आणि मुलांसाठी दोन वसतिगृहेही सुरू आहेत. सीएनआयशी संबंधित नितीन लॉरेन्स यांनी अलीकडेच आरोप केला होता की, पी सी सिंह चर्च आणि शाळांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा देशविरोधी कारवायांमध्ये खर्च करतात. जबलपूरमधील चाइल्ड लाइन 1098 महिला आणि बाल विकास अंतर्गत या गटाद्वारे चालविली जाते. याशिवाय जीविका प्रकल्प, हौन्सला प्रकल्प, आशा किरण कम्युनिटी सेंटर, चाइल्ड फोकस्ड कम्युनिटी, शिशु गृह, बॉश प्रकल्प, गृहिणी प्रशिक्षण केंद्र यासह इतर एनजीओ आधारित प्रकल्पही जबलपूर डायसिसद्वारे चालवले जात आहेत.