नागपूर - उपराजधानी नागपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या निर्बंधाविरोधात व्यापाऱ्यांनी संतप्त होत रस्त्यावर उतरले आहेत. नागपूरच्या संविधान चौकातून 23 व्यापारी संघटनांनी एकत्र येत 'सरकार जागवा व्यापार वाचवा' चा नारा देत आंदोलन केले. कोरोनाच्या नियमात नागपूर लेव्हल एकमध्ये असतांना लेव्हल तीनचे निर्बंध लावल्याने व्यापारी अडचणीत सापडले आहेत. हे निर्बंध शिथिल करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आंदोलन केले.
व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले -
नागपुरात जवळपास फेब्रुवारीपासून अंशतः लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे मागील पाच महिन्यात व्यापारी वर्गाचे पूर्णतः कंबरडे मोडले आहे. यामुळे व्यापारी वर्गाला केवळ दुपारी 4 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा आहे. यामुळे व्यापारी वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. व्यापार डबघाईच्या अवस्थेत आहे. नागपूरच्या संविधान चौकात सर्व व्यापारी वर्गाच्या संघटनांनी एकजूट होत शासनांच्या निर्बंधाना विरोध दर्शवत आंदोलन केले. असे संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी सांगितले.
पूर्णवेळ दुकाने सुरू ठेवण्यासाठी मुभा द्या -
यात सरकार जागवा व्यापारी वाचवा या संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले की सरकारला वारंवार सांगून सुद्धा सरकारने 4 जुलैपासून लागू केलेल्या निर्बंधात नागपूर जिल्हा याला लेव्हल तीनच्या निर्बंधामुळे अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे व्यापारी वर्गाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू केले आहे. सरकारने याची दखल घ्यावी आणि लेव्हल 1 मध्ये आणून दुकाने सुरू ठेवण्याच्या कालावधीत वाढ करावी अशी मागणी केली आहे.
सर्वच व्यवसाय ठप्प झाले, किती दिवस निर्बंध सहन करायचे -
फेब्रुवारी मार्च एप्रिल या महिन्यात कोरोनाच्या प्रकोप असतांना आम्ही दुकाने बंद ठेवले. निर्बधनाचे पालन केले. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्ण संख्या नसल्याने तेथील व्यवहार सुरू होते. आता मात्र तिकडे रुग्ण असतांना नागपूरला निर्बंध लादले जात आहे चुकीचे आहे. मागील मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून रुग्ण संख्या घटली आहे. दुसरी लाट ओसरत असताना किती दिवस निर्बंध सहन करायाचे तिसरी लाट येणार आहे, असे म्हणत हा व्यापारी वर्गावर अन्याय आहे असे म्हणत आहे. हॉटेल इंडस्ट्रीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे कामगार कमी करावे लागले. अनेकांचे पगार कपात करण्यात आली आहे. यामुळे याकडे लक्ष द्यावे अन्यतः परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि या आंदोलना उग्र स्वरूप येईल असा इशारा हॉटेल संघटनेचे अध्यक्ष जितेंदरसिग रेणू यांनी दिला आहे.
सरकारने अडचण समजून घ्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा -
यावेळी पायदळ मार्च संविधान चौकातून काढता मनपापर्यंत जाऊन मार्च काढण्यात आला. हातात तानाशाही निर्णयाला विरोध येतो, यासह अन्य मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले. यानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून पुढील काळात तीव्र आंदोलन केले जाईल असाही सुरू व्यापारी संघटनाकडून निघतांना आंदोलनातुन दिसून आला.