ETV Bharat / city

'चुकीच्या पोस्ट समाज माध्यमांवर पसरविणाऱ्यांवर कारवाई करणार' - सोशल मिडिया

जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या नावाने चुकीचा संदेश व्हॉट्सॲप ग्रुप आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे जिल्हा माहिती कार्यालयाकडून कोणतेही वृत्त दिले नसताना चुकीचा, गैरसमज व भीती पसरवणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
author img

By

Published : May 3, 2021, 9:50 PM IST

नागपूर - जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या नावाने चुकीचा संदेश व्हॉट्सॲप ग्रुप आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे जिल्हा माहिती कार्यालयाकडून कोणतेही वृत्त दिले नसताना चुकीचा, गैरसमज व भीती पसरवणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

'चुकीच्या पोस्ट समाज माध्यमांवर पसरविणाऱ्यांवर कारवाई करणार'
नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचा संदर्भ देऊन 'जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना' या मथळयाखाली काही संदेश व्हॉट्सॲपवर टाकण्यात आला आहे. त्यात जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाखाली प्रसारित करण्यात येत आहे. या प्रकारचे कोणतेही वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेले नाही. राज्य शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या कोविड प्रोटोकॉल सूचनेशिवाय जिल्हा माहिती कार्यालयाकडून असे कोणतेही वृत्त प्रकाशित केले जात नाही. या वृत्ताचा जिल्हा माहिती कार्यालयाशी संबंध नाही, असा खुलासा नागपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केला आहे.राज्य शासनाने कोविड काळात घ्यावयाची काळजी या संदर्भात यापूर्वी काढलेला आदेश स्वयंस्पष्ट आहे. जिल्हा प्रशासनाने वेगळे नवीन कोणतेही निर्देश काढलेले नाही. कोरोना संदर्भात शासन आणि प्रशासनाच्यावतीने राज्यस्तरावर दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचना प्रसार माध्यम व नागरिकांपर्यंत अधिकृतरित्या जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे प्रसारित करण्यात येतात, याची सर्वांनी नोंद घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

'भीती, गैरसमज पसवरणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवण्याच्या सूचना'

हे वृत्त कोणी प्रसारित केले याबाबत सायबर सेलकडे तपासणीसाठी देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमण काळात लोकांमध्ये भीती व गैरसमज पसरवणाऱ्या अन्य पोस्टवरही लक्ष ठेवण्याची सूचना सायबर सेलला केली आहे.

हेही वाचा - नीट-पीजी चार महिन्यांनी पुढे ढकलली! इंटर्न डॉक्टरही कोरोनाबाधितांवर करणार उपचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.