ETV Bharat / city

Tarri Pohe : नागपुरात 70 वर्षीय वृद्ध दाम्पत्य पोहे विकून हाकताहेत संसाराचा गाढा; व्हायरल व्हिडिओनंतर मदतीचा ओघ - भास्कर जुनघरे पोहे

भास्कर जुनघरे यांनी पाच वर्षांपूर्वी तांडापेठ भागात तर्री पोहे विकण्याचा ( Nagpur Tarri Pohe ) व्यवसाय सुरू केला होता. अनेक संकटांचा सामना करत त्यांनी आपल्या उपजीविकेचे साधन ठरलेला हा व्यवसाय ( Nagpur old couple making tarri poha ) जोपासला आहे. याकरिता तांडापेठ भागातील तरुणांनी पुढाकार घेऊन काका व काकूंच्या हातची चव संपूर्ण नागपूर शहरात आणि जिल्ह्यात प्रसिद्ध केली आहे.

वृद्ध दाम्पत्य पोहे विकून हाकताहेत संसाराचा गाढा

author img

By

Published : Dec 7, 2021, 5:40 PM IST

Updated : Dec 7, 2021, 6:58 PM IST

नागपूर - नागपूर शहरातही तांडापेठ भागात राहणारे ७० वर्षीय वृद्ध दाम्पत्य जगण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांच्या संघर्षाची व्यथा समाज माध्यमांवर व्हायरल ( Nagpur old couple seller story ) होताच केवळ तांडापेठच नाही तर संपूर्ण नागपूर शहरातून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भास्कर जुनघरे आणि त्यांची पत्नी सुमित्रा जुनघरे या दाम्पत्याचा जीवन संघर्ष पाहून अनेक जण मदतीसाठी सरसावले आहेत.

भास्कर जुनघरे यांनी पाच वर्षांपूर्वी तांडापेठ भागात तर्री पोहे विकण्याचा ( Nagpur Tarri Pohe ) व्यवसाय सुरू केला होता. अनेक संकटांचा सामना करत त्यांनी आपल्या उपजीविकेचे साधन ठरलेला हा व्यवसाय ( Nagpur old couple making tarri poha ) जोपासला आहे. याकरिता तांडापेठ भागातील तरुणांनी पुढाकार घेऊन काका व काकूंच्या हातची चव संपूर्ण नागपूर शहरात आणि जिल्ह्यात प्रसिद्ध केली आहे. अचानक लोकांची वाढलेली गर्दी आणि खवय्यांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त दादमुळे जुनघरे दाम्पत्य समाधानी झाले आहेत.

उत्स्फूर्त दादमुळे जुनघरे दाम्पत्य समाधानी

हेही वाचा-Bhosari MIDC Land Deal Case : मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत पोहे विक्री-
जुनघरे आजी-आजोबांना सध्या कुणाचाही आधार नाही. पाच मुलींचे शिक्षण झाल्यानंतर त्याचे लग्न लावून दिले. त्यामुळे मुली स्वतःच्या संसारात रमल्या आहेत. वेळ प्रसंगी त्या धावून येतात. मात्र त्यांच्यात असलेला स्वाभिमान त्यांना या वयातही कष्ट घेण्यासाठी प्रेरित करत आहेत. भास्करराव आणि सुमित्रा जुनघरे हे वृद्ध दाम्पत्य एकमेकांच्या मदतीने नागपूरातील प्रसिद्ध तर्री-पोहे विकून स्वतःच्या डोक्यावरील छप्पर सलामत राहावे यासाठी प्रयत्न करत आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून तर दुपारी एक वाजेपर्यंत पोहे विक्री करतात. त्यामधून मिळणाऱ्या पैश्यातून ते संसाराचा गाढा हाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

वृद्ध दाम्पत्य तर्री पोहे विकून हाकताहेत संसाराचा गाढा

हेही वाचा-Thane Crime News : सेल्फीच्या नादात 13 वर्षीय मुलाने गमावला जीव

तांडापेठच्या तरुणांनी दिला आधार
पाच वर्षांपूर्वी भास्करराव आणि त्यांची पत्नी सुमित्रा सायकलवर तर्री पोहे विकण्याचा प्रयत्न करत होते. परिसरातील तरुण मुलांना त्यांची धडपड दिसून आली. तेव्हा काहींनी या दाम्पत्याला मदतीचा हात दिला. काहींनी विरोधदेखील केला. मात्र, आज जुनघरे दाम्पत्य एका जागी स्थिरावले आहेत. मदत करणाऱ्या तरुणांचे त्यांनी आभार मानले आहेत.

हेही वाचा-VIDEO : 7 वर्षीय राघवने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड, चक्रासन करत तिसऱ्या माळ्यावरून खाली उतरला

सोशल मीडियाची किमया
वृद्ध जुनघरे दाम्पत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून अनेक तरुण-तरुणी आणि इतर नागरिक त्यांना भेटण्यासाठी येऊ लागले आहेत. अनेकांनी त्यांना मदतीचा हातदेखील दिला आहे. त्यामुळे निराश झालेल्या त्यांचे जीवन पुन्हा एकदा आशेने भरले आहे.

Last Updated : Dec 7, 2021, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.