मुंबई - जगातील सर्वात मोठा मुंबईतील शिवडी ते एलिफंटा बेटाला ( Shivdi to Elephanta Rope Way ) जोडणार समुद्रावरील रोप-वे प्रकल्प अडचणीत सापडलेला आहे. गेल्या चार वर्षांपासून पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि पर्यावरण विभागाने याप्रकल्पाला ( Tourism Deapertment ) अद्यापही हिरवा कंदील न दिल्याने हा प्रकल्प रखडत असल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी या प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढत जात आहे. याबाबदच्या ईटीव्ही भारताचा विशेष रिपोर्ट.
काय आहे प्रकल्प? - मुंबईतील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी समुद्र आणि नदीकाठच्या शहरांमध्ये जलवाहतूक विकसित करण्यावर तत्कालीन केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरीं यांनी अनेक प्रकल्पांची घोषणा केली होती. त्यातील मुंबई ते अलिबाग रोरो बोटी आणि मुंबई ते बेलापूर हायस्पीड वॉटर टॅक्सी सारखे प्रकल्प आज प्रत्यक्षात सुरूही झाले आहे. याशिवाय मुंबईतील शिवडी ते एलिफंटा बेटाला जोडणार 8 किलोमीटर असा समुद्रावरील रोप-वे प्रकल्प आज रखडलेल्या आहे. रोप-वे प्रकल्पामुळे मुंबई ते घारापुरी येथील एलिफंटा बेटापर्यंत आठ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी फक्त 14 मिनिटे लागतील. सध्या हेच अंतर बोटीने पार करण्यासाठी एक तास लागतो आहे. हा भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातील पहिला समुद्रातील रोप-वे असणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजीत खर्च तब्बल 700 कोटी रुपयांचा येणार आहे. मात्र, प्रकल्पाला उशीर होत असल्याने या प्रकल्पाचा खर्च एक हजार कोटीच्या घरात जाणार आहे.
काय आहे वैशिष्ट्य - सर्वाधिक मोठा समुद्री रोप-वे लंबाई ही 8 किलोमीटर आहे. या प्रकल्पासाठी एकूण 700 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. शिवडी ते एलिफंटा बेटापर्यंतच्या या रोप-वेसाठी समुद्रात 10 ते 12 टॉवर उभे केले जाणार आहे. टॉवरची लंबाई 50 ते 150 मीटरपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे ही रोप- वे झाल्यानंतर जहाज वाहतुकीवर कोणताही परिणाम पडणार नाही. या रोप-वे खालून जहाजांची वाहतूक करता येणार आहे.
रोप-वेमुळे पर्यटकांची संख्या वाढणार - एलिफंटा लेणी मुंबईमधील मुंबईच्या दुसर्या किनार्यावर वसलेले आहे. 1987 मध्ये युनेस्को जागतिक पुरातन वास्तू ठिकाण म्हणून एलिफंटा लेणी घोषित करण्यात आले. एलिफंटा लेणी बघण्यासाठी साधारणता दररोज चार ते पाच हजार पर्यटन येत असतात. मात्र, रोप-वे सुरू झाल्यानंतर एलिफंटा लेणी बघायला पर्यटकांची संख्या पाच हजाराहून 12 हजारपर्यत पोहचणार असल्याचा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टचा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
रोप-वे प्रकल्प का रखडलेला आहे? - मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी सांगितले की, शिवडी ते एलिफंटा बेटाला जोडणार समुद्रावरील रोप- वे प्रकल्प पर्यटकांच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहे. मात्र, समुद्रावरून रोप-वे जाणार असल्याने आणि एलिफंटा जागतिक पुरातन वास्तू असल्याने सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. सध्या या प्रकल्पाला पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळालेली नाही. या दोन्ही विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहितीही राजीव जलोटा यांनी दिली आहे.