मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरी केंद्रीय यंत्रणांची धाड पडणार असल्याची शक्यता आहे. यासंदर्भात नवाब मलिक यांनी सुचक टि्वट ( Ncp Leader Nawab Malik Tweet ) केले आहे. पहाटे माझ्या घरी काही सरकारी पाहुणे येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या स्वागतासाठी मी खुल्या दिलाने तयार आहे. त्यांच्यासाठी चहा आणि बिस्कीटही तयार असतील. त्यांना माझ्या घराचा अचूक पत्ता हवा असेल तर मला फोन करावा, असे टि्वट नवाब मलिक यांनी ( Nawab Malik hint Possible Raids ) केले आहे. मात्र, सोमवारी सकाळपर्यंत नवाब मलिकांच्या घरी कोणतीही धाड पडल्याचे वृत्त नाही.
सरकारी तपास यंत्रणांची भीती -
महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सरकारच्या चौकशीकडे लक्ष वेधले. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, असा दावा त्यांनी यापूर्वी सुध्दा ट्विट करून केला होता. काही दिवसापूर्वी, नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली होती.
यापूर्वीचे मलिक यांचे टि्वट -
नवाब मलिक यांनी यापूर्वीही ट्विट केले होते. 'कॉम्रेड्स, मी ऐकले आहे, माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. घाबरणे म्हणजे रोज मरणे, घाबरायचे नाही, लढायचे आहे. गांधींनी गोर्यांशी लढा दिला होता, आम्ही चोरांशी लढू', असे टि्वटमध्ये केले होते.
न्यायालयाने मलिक यांना फटकारले होते -
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ध्यानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यापूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर केलेल्या वक्तव्याबद्दल न्यायालयात बिनशर्त माफी मागितली होती. नवाब मलिक समीर वानखेडे आणि त्याच्या कुटुंबीयांबद्दल जाणूनबुजून बोलत राहतात, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना फटकारले होते. या प्रकरणी समीर वानखेडेचे वडील ध्यानदेव यांनी मलिक यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करून 1.25 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती.
हेही वाचा - Defamation Petition on Nawab Malik : ज्ञानदेव वानखेडेंच्या याचिकेवर नवाब मलिक यांच्याकडून प्रतिज्ञापत्र दाखल