ETV Bharat / city

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची मते निर्णायक ठरणार?

author img

By

Published : May 18, 2022, 7:30 AM IST

मुंबईत असलेल्या उत्तर भारतीयांची संख्या ( BMC elections North Indian people vote) पाहता उत्तर भारतीयांची मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे का? ही मते कोणाच्या बाजूने असणार? काय असू शकतात समीकरणे? राजकीय पक्ष कशा पद्धतीने करत आहेत तयारी? याबाबत ( BMC elections North Indian people vote ) आज जाणून घेऊया.

BMC elections North Indian people vote
मुंबई महापालिका निवडणूक मत

मुंबई - मुंबई महानगरपालिका म्हणजे, 'सोन्याची अंडे देणारी कोंबडी', असे म्हटले जाते. या मुंबई महानगरपालिकेची २०२२ ( BMC elections 2022 news) ची निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेने कंबर कसली असून मुंबईत ( BMC elections and north Indian vote ) झालेल्या उत्तर भारतीय हिंदी भाषी संकल्प सभेमध्ये या निवडणुकीचा श्री गणेशा करत माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी रणशिंग फुंकले आहे. मुंबईत असलेल्या उत्तर भारतीयांची संख्या ( BMC elections North Indian people vote) पाहता उत्तर भारतीयांची मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे का? ही मते कोणाच्या बाजूने असणार? काय असू शकतात समीकरणे? राजकीय पक्ष कशा पद्धतीने करत आहेत तयारी? याबाबत ( BMC elections North Indian people vote ) आज जाणून घेऊया.

माहिती देताना उत्तर भारतीय मोर्चा, महाराष्ट्रचे अध्यक्ष संजय पांडे

हेही वाचा - Today Petrol-Diesel Rates : 'या' जिल्ह्यात पेट्रोल- डिझेल झाले स्वस्त.. वाचा आजचे पेट्रोल- डिझेलचे दर

कृपाशंकर सिंह व राजहंस सिंह या उत्तर भारतीय नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी? - दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या सुमारे ३५ लाख इतकी आहे. तर मतदारांची संख्या ही १५ लाखाच्या आसपास आहे. उत्तर भारतीयांची ही संख्या निवडणुकीच्यावेळी निर्णायक भूमिका बजावत असते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील प्रत्येक क्षेत्रात उत्तर भारतीय कार्यरत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या जुन्या वॉर्ड रचनेनुसार असलेल्या २२७ मतदार संघापैकी जवळपास ५० वॉर्डमध्ये उत्तर भारतीयांचेच वर्चस्व आहे. विशेष करून दिंडोशी या विधानसभा मतदार संघात उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच भाजप नेते राजहंस सिंह यांना भाजपने मुंबई महानगरपालिकेवरून विधान परिषदेमध्ये आमदारकी दिली आहे. महापालिका सभागृहात त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम केले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत याच दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले. मुंबईतील प्रश्नांचा त्यांना चांगला अभ्यास असून मुंबईतील उत्तर भारतीय मतदारसंघांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. हिंदीबरोबर मराठी भाषेवर त्यांची चांगली पकड असल्याने या प्रभावाचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप पुरेपूर वापर करून घेणार असून त्या पद्धतीची रणनिती सुद्धा आखली गेली आहे.

भाजप उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबाची मूळ ही उत्तर प्रदेशातच आहेत. मुंबई आणि उपनगरातील उत्तर भारतीयांमध्ये कृपाशंकर सिंह यांचा दांडगा जनसंपर्क आहे . त्याचा फायदा सुद्धा भाजपला होणार आहे. मी एक पक्षाचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. त्यामुळे, पक्ष जे काम माझ्यावर सोपवेल ते मी पूर्ण करणार, असा निर्धारही कृपाशंकर सिंग यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मुंबईतील बराच उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेसला मानणारा आहे. या मतदारांना आकर्षित करणारा चेहरा भाजपकडे नव्हता. म्हणून माजी मंत्री कृपाशंकर सिंह व राजनाथ सिंह हे दोन काँग्रेसचे वरिष्ठ नेते भाजपमध्ये आल्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत याचा फायदा भाजपला होणार आहे.

शिवसेनेला उत्तर भारतीयांची मते भाजपमुळेच मिळायची? - यासंदर्भात बोलताना महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी सांगितले की, उत्तर भारतीय लोकांचा भाजपकडे कल वाढत आहे. उत्तर भारतीय समाज हा नेहमी भाजपसोबत राहिलेला आहे. शिवसेनेला सुद्धा मत भाजपमुळेच भेटत होती. त्यात परवाची देवेंद्र फडवणीस यांची उत्तर भारतीय हिंदी भाषी महासंकल्प सभा बघून शिवसेना भयभीत झाली आहे. त्यांना कळून चुकले आहे उत्तर भारतीय मतदार सध्या कोणा सोबत असणार आहे. यंदा मुंबई महापालिका हातातून निसटणार हे आता स्पष्ट झाले आहे. व त्यामुळे त्यांच्या नेत्यांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. उत्तर भारतीय हे नेहमी देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना त्या पाच वर्षांच्या काळात उत्तर भारतीयांना मुंबईत पूर्णत: सुरक्षित वाटले होते. परंतु, करोनामध्ये सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांना पायी गावी जावे लागले, त्यात त्यांचे खूप हाल झाले. परंतु, देवेंद्र फडवणीस यांच्या एका आव्हानाने भाजपने रस्त्यावर उतरून सेवा प्रकल्प चालू केला. त्याचा नक्कीच फायदा या निवडणुकीमध्ये होईल.

उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष, संजय पांडे यांनी ज्या पद्धतीने हिंदी भाषी महा संकल्प सभेचे आयोजन करून संपूर्ण समाजाला एकत्र आणण्याचे काम केले, त्याची दखल पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. विशेष करून या कार्यक्रमातूनच मुंबई महानगरपालिकेचे रणशिंग देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फुंकले गेले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता आणि उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा आणलेली सत्ता, यामुळे लोक भाजपकडे वळतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुंबईत योगी यांचे कार्यालय तर काँग्रेसचे हिंदी भाषा भवन? - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत राहणाऱ्या उत्तरप्रदेशच्या नागरिकांसाठी कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्यालय मुंबईतील असंघटित उत्तर भारतीय लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करेल. तसेच, दुसर्‍या राज्यात असलेल्या नागरिकांसाठी त्या राज्यात कार्यालय सुरू करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. मुंबईत जवळपास ३५ लाख उत्तर भारतीय नागरिक राहतात. त्यामुळे, ही वोट बँक तयार करण्यास सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अप्रत्यक्षपणे पुढाकार घेताना दिसत आहेत.

दुसरीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय मुंबई काँग्रेसकडून घेण्यात आलेला आहे. उत्तर भारतीय समाजावर होणारे अन्याय, त्यांच्या विविध समस्या व त्यांना संरक्षण देण्यासाठी मुंबई काँग्रेसकडून उत्तर भारतीय पंचायतची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे. या पंचायतीच्या माध्यमातून मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रात प्रत्येक वॉर्डमध्ये उत्तर भारतीयांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुद्धा मुंबई काँग्रेस करत आहे. त्याचबरोबर जेव्हा राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या युतीचे सरकार होते तेव्हा डॉक्टर राम मनोहर त्रिपाठी यांच्या नावावर मुंबईमध्ये हिंदी भाषा भवन बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली होती. परंतु, आता तो मुद्दा मागे पडला असून पुन्हा एकदा मुंबईत हिंदी भाषा भवन लवकरच बनवण्याची घोषणा काँग्रेस करणार असल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर भारतीयांची १९ टक्के मते निर्णायक - २०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत २२७ वॉर्डपैकी शिवसेनेला ८४, भाजप ८२, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी ८, मनसे ७ आणि इतर उमेदवारांना १४ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे, ८४ जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु, सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०१२ च्या निवडणुकीत फक्त ३१ जागा असणाऱ्या भाजपने २०१७ च्या निवडणुकीत ८२ जागा जिंकून शिवसेनेला सज्जड इशारा दिला होता. हे ओळखूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे उत्तर भारतीय समाजाच्या लोकांशी सतत संपर्क साधत आहेत.

याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे हे पुढील महिन्यात अयोध्या दौरा करणार आहेत. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापू लागले आहे. परंतु, आता ज्या पद्धतीने शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार उघड करण्याची मोहीम 'पोलखोल' व 'मराठी कट्टा' या कार्यक्रमाद्वारे भाजपकडून मुंबईत घेण्यात आलेली आहे हे सर्व पहाता सत्तास्थापनेसाठी ११४ हा जादुई आकडा पार करणे अवघड असले तरी त्यासाठी मुंबईत असणारी १९ टक्के उत्तर भारतीयांची मते मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी निर्णायक ठरणारी आहेत.

हेही वाचा - Minister Bungalow Electricity Issue :...अन् पुन्हा मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्ती झाली गुल!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.