मुंबई - उपनगरीय लोकल ट्रेन म्हणजे जणू मुंबईची जीवनवाहिनी. दररोज लाखो प्रवासी आपले तासनतास वेळ लोकल ट्रेनचा प्रवासात घालवतात. मात्र, आता महिला सुरक्षेसाठी महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहे. (Installed CCTV In local Train) यामुळे अनेक महिला प्रवाशांना लोकल प्रवासात अवघडल्या सारखे वाटू शकते. कारण वेळेत लोकल पकडण्यासाठी अनेक चाकरमानी महिला आपला शृंगार आणि कपडे व्यवस्थितीत करण्याचे काम महिला डब्यातच आटोपतात. (Women Afraid of local Train CCTV ) मात्र, आता डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येत असल्याने कुणी आपल्याला चोरून तर पाहत नाही ना, या विचारानेच थोडे अवघडल्या सारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया अनेक महिला प्रवाशांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली आहे. दरम्यान, याशिवाय रेल्वेने लोकल डब्याऐवजी सीसीटीव्ही लोकलच्या प्रवेश द्वारावर लावण्याची मागणीही केली आहे.
सीसीटीव्हीची महिलांवर नजर
दररोज लाखोंचा संख्येने महिला प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. अनेकदा महिलांना कार्यालयात वेळेत पोहचण्यासाठी वेळेवर लोकल पकडावी लागते. त्यामुळे अनेक महिला प्रवासी घरातून निघत असताना महिला लोकल डब्यात शृंगार आणि केस विंचरणे करत असतात. तर, काही महिला कार्यलातून घरी जात असताना खाली लोकल ट्रेनच्या आसनावर लोटूनसुद्धा प्रवास करतात. मात्र, आता महिला सुरक्षेसाठी मध्य रेल्वेकडून सीसीटीव्ही कॅमेरे महिला डब्यात लावण्यात येत आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी लावण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरामुळे महिला प्रवाशांची डोकेदुखी ठरत असल्याचे काही महिला प्रवाशांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अनेक महिला प्रवासी शृंगारांची सामुग्री डब्यातील फेरीवाल्यांकडून घेतात. महिला डब्यातील प्रवासी सहजपणे खरेदी करत असल्याने महिला डब्यामध्ये फेरीवाल्यांची वर्दळ जास्त असते. आता सीसीटीव्ही कॅमेरे लागल्याने महिला डब्यात महिला प्रवाशांना शृंगारांची सामुग्री आणि इतर वस्तू खरेदी करता येणार नाही.
महिला प्रवासी श्वेता झगडे यांनी सांगितले की, लोकल ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर महिलांसाठी एक प्रकारची सुरक्षाचे होईल. मात्र, त्या सीसीटीव्हीचा गैरफायदा नाही झाला पाहिजे. काही वेळेस महिलांकडून अनवधानाने कपडे अस्थाव्यस्थ होतात. तेव्हा महिला आपले कपडे व्यस्थितीत करत असतांना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैदीत होण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे महिला डब्यात लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण महिला जवानांकडे द्यायला हवेत. तर महिला प्रवासी ज्योती दुबे यांनी सांगितले, रेल्वेने महिला सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कँमेरे आम्ही स्वागत करतोय. मात्र, मुंबई सारख्या शहरात नोकरदार महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. घरातले काम आवरून त्यांना वेळेत कार्यालयात पोहचावे लागते. सकाळी नोकरीसाठी कार्यालयात जाण्यासाठी निघते, तेव्हा बऱ्याच महिला आपला मेकअप लोकल डब्यात करत असतात. कारण अनेक महिला प्रवासी वेळे अभावी मेकअपचे सामान आपल्या बॅगेत बाळगत असतात. मात्र, रेल्वेने महिला सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे महिलांचे प्रायव्हसी आता धोक्यात येण्याची चिन्ह दिसून येत आहे.
वरिष्ठ वकील अशोक कुमार दुबे यांनी सांगितले की, महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय हा कौतुकास्पद आहे. मात्र, रेल्वेने महिला प्रवाशांचा प्रायव्हसीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. लोकलने दररोज लाखो महिला प्रवास करतात. गर्दीची वेळ असो वा शुकशुकाटाची चोरी, चेन स्नॅचिंग, छेडछाड यासारख्या गुन्ह्यांने घडतात. मात्र, जेव्हा गुन्हेगार महिला डब्यात प्रवेश करतोय तेव्हा तो लोकल ट्रेनचाचा प्रवेशद्वारातून आता शिरतोय. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे महिला डब्याचा प्रवेशद्वारावर असणे गरजेचे आहे. महिला डब्याचा आता सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने महिला प्रवाशांची प्रायव्हसी विचार करणे गरजेचे आहेत.
स्थानकावर विशेष कक्ष तयार करा -
महिला प्रवाशांचा डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे लोकल डब्यात आता लावण्यापेक्षा लोकल ट्रेनचा प्रवेश द्वारा लावणे फार महत्वाचे आहे. कारण गेल्या काही वर्षात फटका गॅंगच्या टोळीमुळे अनेक महिला प्रवाशांचे अपघात झाले आहे. त्यामुळे रेल्वेने डब्यात आता लावण्यापेक्षा सीसीटीव्ही कॅमेरे महिला डब्याचा प्रवेशद्वार लावणे गरजे आहे. याशिवाय आता सीसीटीव्ही कॅमेरामुळे महिला प्रवाशांना कपडे नीट करताना अवघडल्या सारखे वाटणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रमुख रेल्वे स्थानकांवर महिलांसाठी विशेष कक्ष तयार करावेत. जिथे लोकल प्रवास संपताच महिला कपडे आणि आपले केस व्यस्थितीत करून कार्यालय जाता येईल. मात्र, आज रेल्वेत महिलांसाठी प्रसाधनगृहांची व्यस्था नीट नाही. त्यामुळे रेल्वेने महिला प्रवाशांचा या प्रायव्हेसीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दिली आहे.
सर्व महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे-
उपनगरीय लोकलच्या प्रवासात सध्या महिलांना डब्यांच्या रचनेत साधारण २० टक्के जागा दिली जाते. त्याशिवाय, महिलांसाठी पुरेशी प्रसाधनगृहं नसल्यामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागते आहे. महिला प्रवाशांसाठी सुरुवातील पश्चिम रेल्वेने ५ मे १९९२ रोजी पहिली महिला स्पेशल लोकल सुरू केली. सध्यस्थितीत पश्चिम रेल्वे मार्गावर १० तर मध्य रेल्वे मार्गावर ४ महिला स्पेशल लोकल चालविण्यात येत आहेत. मध्य रेल्वे उपनगरी गाड्यांच्या दररोज १७७४ फेऱ्यांतून ४५ लाख प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये १३ लाख महिला प्रवाशांचा समावेश आहे. महिला प्रवाशांचा सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने मार्च २०२३ पर्यंत सर्व महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२१ रोजी मुंबई विभागाच्या मध्य रेल्वेने महिला प्रवाशांच्या डब्यात ६०५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते.
हेही वाचा - मैदानाला टिपू सुलतान नाव दिले तर भाजप राज्यभर आंदोलन करेल -चंद्रकांत पाटील