ETV Bharat / city

Dussehra Melawa : एसटी महामंडळाला दहा कोटी भरणारा शिंदे गटाचा सूत्रधार कोण? चौकशी करण्याची अंबादास दानवेंची मागणी - Who mastermind Shinde group

दसरा मेळाव्याला ( Dussehra Melawa at BKC Maidan ) गर्दी जमवण्यासाठी सुमारे १७९५ विशेष एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्या. शिंदे गटाकडून ( Shinde group ) यासाठी एकरकमी नऊ कोटी ९९ लाख रुपये एकरकमी भरण्यात आले. हे पैसे भरणार शिंदे गटाचा सूत्रधार कोण? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ( Ambadas Danve Leader Opposition Legislative Council ) यांनी उपस्थित केला.

Ambadas Danve
अंबादास दानवे
author img

By

Published : Oct 6, 2022, 8:55 PM IST

मुंबई - बीकेसी मैदानात दसरा मेळाव्याला ( Dussehra Melawa at BKC Maidan ) गर्दी जमवण्यासाठी सुमारे १७९५ विशेष एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्या. शिंदे गटाकडून ( Shinde group ) यासाठी एकरकमी नऊ कोटी ९९ लाख रुपये एकरकमी भरण्यात आले. हे पैसे भरणार शिंदे गटाचा सूत्रधार कोण? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ( Ambadas Danve Leader Opposition Legislative Council ) यांनी उपस्थित केला. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांच्या घरी ११ लाख रुपये रक्कम सापडल्यावर त्यांच्यावर ईडीची चौकशी करून कारवाई केली. मग विशेष बसेससाठी रोख रक्कम भरलेल्या व्यक्तीची चौकशी करणार का असा सवाल केला. मुंबई आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दसरा मेळाव्यासाठी १७९५ एसटी - शिंदे गटाने आयोजित केलेला दसरा मेळाव्यासाठी १७९५ एसटी महामंडळाच्या विशेष बसेस राज्यातून बुक करण्यात आल्या. या बसेस आरक्षित केल्यानंतर ९ कोटी ९९ लाख ४० हजार ५०० रुपये रोख स्वरूपात आगार व्यवस्थापक मुंबई आगार यांच्याकडे ३ ऑक्टोबरला भरले. या मेळाव्यासाठी १७९५ बसेसपैकी प्रत्यक्षात १६२५ बसचा बसेसचा वापर झाला. उर्वरित १७० बसेसचे भरलेल्या पैशांचा परतावा एसटी कोणाला करणार? सामान्य व्यक्तीला बँकेत ५० हजारापेक्षा जास्त रक्कम भरायची असल्यास त्याला अधिकृत ओळखपत्र सादर करावे लागते, मग इतकी मोठी रक्कम भरताना एसटी महामंडळाने त्याची विचारपूस केली का? असा सवाल दानवे यांनी एसटी महामंडळाला विचारला.

रक्कम कोणी भरली? आरक्षित केलेल्या बसेस इतर आगारातून मागविण्यात आल्या होत्या का? इतर आगारातून बसेस पुरविण्यासाठी महामंडळाचे किती किलोमीटर व्यर्थ झाले व सदर व्यर्थ झालेल्या किलोमीटरची रक्कम पक्षकाराकडून भरली आहे का? असे प्रश्न दानवे यांनी उपस्थित केले. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी विशेष बस सेवा परिपत्रकाचे उल्लंघन राज्य परिवहन महामंडळाकडून झाल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. एकीकडे संजय राऊत यांच्याकडे ११ लाख रक्कम मिळाली त्याची ईडी चौकशी झाली होती. आता एवढी मोठी रक्कम भरली तो समोर आला पाहिजे ही रक्कम कोणी भरली, त्याचा तेवढा इंनकम सोर्स आहे का? याची माहिती मिळावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.