ETV Bharat / city

...तर मग सुशांतचे मारेकरी कोण? हे सीबीआयने सांगावे; कॉंग्रेस-राष्ट्रवादीने उपस्थित केला प्रश्न

सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते, असा थेट आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तर कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनीही ट्वीट करत सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

sushant sing rajputs suicide news
...तर मग सुशांतचे मारेकरी कोण? हे सीबीआयने सांगावे; कॉंग्रेस-राष्ट्रवादीने उपस्थित केला प्रश्न
author img

By

Published : Jun 14, 2021, 3:25 PM IST

मुंबई - सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणुक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते, असा थेट आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनीही ट्वीट करत सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

प्रतिक्रिया

सीबीआय तपासातून काय निष्पन्न झाले - नवाब मलिक

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारने दाखल केला होता. तसेच ही केस सीबीआयकडे देण्याची मागणी केंद्र सरकारला केली होती. परंतु यातून निष्पन्न काय झाले, असा प्रश्नही नवाब मलिक यांनी केला आहे. एक वर्षानंतर सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही. त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती, तर त्याचा हत्या कोणी केली, हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल? - सचिन सावंत

सुशांतसिंग राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. तसेच सीबीआय चौकशीला ३१० दिवस व एम्स पॅनेलने हत्येचा मुद्दा निकाली काढण्याला २५० दिवस झाले. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे? अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर निशाण साधला आहे.

sushant sing rajputs suicide news
सचिन सावंत यांचे ट्वीट

हेही वाचा - काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नाना पटोले असतील का?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.