ETV Bharat / city

Cruise Drug Case : एनसीबी कारवाईतील पंच फ्लेचर पटेल हा समीर वानखेडेंचा मित्र; नवाब मलिकांचा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक एनसीबीवर निशाणा साधत अनेक खळबळजनक आरोप करत आज त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक आरोप केला आहे. एनसीबीच्या तीन केसमध्ये फ्लेचर पटेल हा एकच व्यक्ती पंच कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

nawab malik press conferene
nawab malik press conferene
author img

By

Published : Oct 16, 2021, 11:32 AM IST

Updated : Oct 16, 2021, 1:52 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक एनसीबीवर निशाणा साधत अनेक खळबळजनक आरोप करत आज त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक आरोप केला आहे. एनसीबीच्या तीन केसमध्ये फ्लेचर पटेल हा एकच व्यक्ती पंच कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी खुलासा करताना फ्लेचर पटेल हा व्यक्ती एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे यांचा मित्र असल्याचे म्हटले आहे. याबाबतचे ट्वीट त्यांनी केले आहे.

  • Fletcher Patel is a friend of #NCB official Sameer Wankhede and his family.
    I have presented 3 different Panchnamas where Fletcher Patel is a Panch.
    Question arises,
    Can a friend of an NCB official be allowed to be a Panch ?
    Is it legally allowed ?

    — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फ्लेचर पटेल हा समीर वानखेडेचा मित्र -

फ्लेचर पटेल हा व्यक्ती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाचे मित्र आहेत. मी तीन वेगवेगळे पंचनामे सादर केले आहेत. जेथे फ्लेचर पटेल हे पंच आहेत. त्यामुळे एनसीबी अधिकाऱ्याच्या मित्राला पंच बनण्याची परवानगी देता येईल का? याला कायदेशीर परवानगी आहे का?, असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

फ्लेचर पटले तीन कारवाईत पंच -

एनसीबीकडून जेव्हा एखादी कारवाई करण्यात येते, या कारवाईनंतर प्रतिष्ठित व्यक्तीला पंच म्हणून निवडल जाते. हे पंच वादी किंवा प्रतिवादी अशा दोन्ही बाजू पैकी कोणीही नसावेत, असा कायदा आहे. मात्र, फ्लेचर पटेल हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कार्यक्रमांमध्ये समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांसोबत ते दिसतात, असे असताना 25 नोव्हेंबर 2020 ला एमसीबीने केलेल्या कारवाई फ्लेचर पटेल पंच आहेत. त्यानंतर 9 डिसेंबर 2020 या दिवशी केलेल्या केसमध्ये देखील फ्लेचर पटेल पंच आहेत. तसेच 2 जानेवारी 2021 ला करण्यात आलेल्या कारवाईदेखील त्यांचे नाव पंच म्हणून आहेत. एकच व्यक्ती एनसीबीने केलेल्या तीन कारवायांमध्ये पंच कसा काय असू शकतो, या प्रश्नाचे उत्तर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी द्यावे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

  • Fletcher Patel seen in this picture with someone who he calls 'My Lady Don'.
    Who is this 'Lady Don' ? pic.twitter.com/epTRSopDcH

ती लेडी डॉन कोण? -

फ्लेचर पटेल यांनी आपल्या ट्वीटमधून लेडी डॉनचा उल्लेख केला आहे. ही लेडी डॉन एका राजकीय पक्षाच्या चित्रपट संघटनेशी संलग्न असून तिच्या माध्यमातून बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना टार्गेट केले जाते. तसेच त्यांच्यावर दबाव टाकला जातो, असा आरोपही नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.

  • Here are the front pages of 3 Panchnamas where Fletcher Patel is a Panch. pic.twitter.com/NOMv5mv1CB

'मुंबई आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न' -

एनसीबीकडून दोन ते पाच ग्राम अमलीपदार्थ पकडले असल्याचे भासवले जाते. याबाबत एनसीपीकडून कारवाई करताना याचा संबंध बॉलीवूड सेलिब्रिटींशी दाखवला जातो. यामुळे या केस हायप्रोफाईल होतात. या सर्व केस खोट्या पद्धतीने एनसीबी समोर आणते, असा आरोप नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा केला. तसेच या खोट्या केसेसच्या माध्यमातून मुंबई शहर आणि मुंबईत असलेल्या बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचेदेखील नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिकांनी ट्वीटमधून दिला होता -

एनसीबीने केलेली कारवाई हा कसा बेबनाव आहे. वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन सर्वांच्या समोर आणू असा, इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीला दिला आहे. नवाब मलिक यांच्याकडून ट्वीट करण्यात आले असून या ट्वीटच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीला प्रश्न विचारला आहे. एनसीबीचे वेगवेगळे गैरप्रकार आता पत्रकार परिषदेतून नाही. तर, ट्वीटरच्या माध्यमातून उघड करणार असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी एनसीबीच्या विरोधात एक ट्वीट केलं आहे. कोण आहे फ्लेचर पटेल? त्याचा एनसीबी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहे? याबाबतचा तपशील लवकरच येथे उघड करेन असे नवाब मलिक यांनी ट्वीटमधून सूचक इशारा दिला आहे.

'क्रुजवरून कारवाई एनसीबीचा बनाव' -

क्रूजवर एनसीबी (अमली पदार्थविरोधी पथकाने) केलेल्या कारवाईनंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी ने केलेल्या कारवाईवर बोट ठेवत आतापर्यंत तीन पत्रकार परिषदा घेतल्या. यामध्ये पहिल्या पत्रकार परिषदेतून क्रूज वर केलेली कारवाई हा एनसीबीचा बनाव असल्याचा आरोप त्यांनी केला. तर दुसऱ्या पत्रकार परिषद मधून एनसीबीचा थेट संबंध भारतीय जनता पक्षातील नेत्यांशी असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच तिसऱ्या पत्रकार परिषदेत एनसीबीने जावाई समीर खान यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे नवाब मलिक यांच्याकडून सांगण्यात आले होते.

हेही वाचा - काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीस सुरवात; आगामी विधानसभा, संघटनात्मक निवडणुकांवर होणार चर्चा

Last Updated : Oct 16, 2021, 1:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.