ETV Bharat / city

दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच! मात्र आपली 'राजकीय ईस्ट इंडिया कंपनी' झोपेत;'सामना'तून केंद्र सरकारवर प्रहार - etv bharat marathi

जम्मू-काश्मीरमध्ये सर्वसामान्य आणि जवानांवरही दहशतवाद्यांचे हल्ले सुरु आहेत. असे असताना भारत सरकार काय करत आहे असा सवाल शिवसेनेने केला आहे. 'हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील. देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे.' असा सणसणीत टोला शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्र सरकारला लगावला आहे.

'सामना'च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर प्रहार

author img

By

Published : Oct 13, 2021, 8:02 AM IST

Updated : Oct 13, 2021, 8:59 AM IST

मुंबई - चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून भारतीय सीमेत घुसखोरी सुरु आहे. त्यांच्याकडून धडका मारल्या जात आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वसामान्य आणि जवानांवरही दहशतवाद्यांचे हल्ले सुरु आहेत. असे असताना भारत सरकार काय करत आहे असा सवाल शिवसेनेने केला आहे. 'हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील. देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे.' असा सणसणीत टोला शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्र सरकारला लगावला आहे.

देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे

'चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. ते घुसखोरी करीत आहेत व आपण चर्चेच्या ' फेऱ्या ' मोजत बसलो आहोत. पाकिस्तान कश्मीरमध्ये जे उपद्व्याप करीत आहे , त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची ' अलोकशाही ' राजवट आणली आहे , त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे. हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील. देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे.' असा सणसणीत टोला शिवसेनेने केंद्र सरकारला लगावला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात

'हिंदुस्थानच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी व धडका मारणे सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे. सीमेवर तणाव आणि रक्तपात वाढला आहे. कश्मीर खोऱ्यांत निरपराध लोकांना घरात, शाळेत, भररस्त्यात गोळ्या घालून मारले जात आहे. त्यात खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद झाल्याचे वृत्त चिंता वाढविणारे आहे. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया सुरूच आहेत हे मान्य, पण त्यात आपल्या सैन्याची मनुष्यहानी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. बांदिपोरा, अनंतनाग भागात एखाद्दुसऱ्या दहशतवाद्यास कंठस्नान घातले हे ठीक, पण त्या बदल्यात आमच्या पाच जवानांचे बळी गेले. या दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे. इतके बळी जात असताना आपण पाकिस्तानचे काय वाकडे केले? असा खडा सवाल शिवसेनेने केला आहे.

भयाने कश्मीरात लोक थांबायला तयार नाहीत

'मोदींचे सरकार असताना कश्मीरातून हिंदूंचे पलायन नव्याने सुरू व्हावे ही गोष्ट काही भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही. दहशतवादाच्या भयाने कश्मीरात लोक थांबायला तयार नाहीत. आपली घरेदारे, जमीनजुमले मागे टाकून पळत आहेत. या सगळ्या लोकांचे दुःख पंतप्रधान, गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे.' असेही शिवसेनेने म्हटले आहे.

'निवडणुकांचा मोसम नसल्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचे साहसी खेळ नाही'

'एकाच वेळी पाच जवानांना कंठस्नान घातले जाते. निरपराध हिंदू पंडितांना, कर्तव्य बजावणाऱ्या मुस्लिम अधिकाऱ्यांना मारले जाते. त्याचा बदला घेतला नाही तर आपल्या भूमीवर सांडलेले रक्त आणि अश्रू वायाच गेले असे होऊ नये. इतर देशांत असे घडले असते तर त्या देशाने सैनिकांच्या हत्येचा बदला लगेच घेतला असता. आता निवडणुकांचा मोसम नसल्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचे साहसी खेळही खेळता येत नाहीत.' असा टोला शिवसेनेने केंद्राला लगावला आहे.

'देशात राजकीय ईस्ट इंडिया कंपनी'

'सुसंस्कृतपणाशी चीनचा उभा दावा असल्याने त्याच्या साम्राज्यवादी विचारांना गल्ली गुंडगिरीचा माज आहे. चीन त्याच्या विस्तारासाठी शेजारच्या राष्ट्रांतील दहशतवादास पाठिंबा देतो. चीन अमली पदार्थांच्या व्यापारास पाठिंबा देतो. चीन शेजारी राष्ट्रांतील अंतर्गत झगडय़ात नाक खुपसून माओवाद विस्तारायच्या नावाखाली शस्त्र्ा व अर्थपुरवठा करतो. चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. ते घुसखोरी करीत आहेत व आपण चर्चेच्या 'फेऱ्या' मोजत बसलो आहोत. पाकिस्तान कश्मीरमध्ये जे उपद्व्याप करीत आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची 'अलोकशाही' राजवट आणली आहे, त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे. हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील. देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे.' असे शिवसेनेने म्हटले आहे.

हेही वाचा - कोयनेच्या चार टप्प्यांतून 1500 मेगावॅट वीजनिर्मिती

Last Updated : Oct 13, 2021, 8:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.