मुंबई - राज्यभर निवडणुका लढवण्याची ही शिवसेनेची सुरूवात आहे. प्रत्येक पक्ष केव्हा ना केव्हा निवडणूक लढविण्याची सुरुवात करत असतो. त्यानुसार आम्ही ही निवडणूक लढवली. हाती आलेल्या निकालानंतर आमच्यात कोठेही नैराश्याचे वातावरण नाही. (Shiv Sena Goa Assembly Election 22) एवढ्या मोठ्या ताकतीने आम्ही पहिल्यांदाच राज्याबाहेर निवडणुका लढवल्या. त्या निवडणुकासाठी जोरदार प्रचार केला. ही आमची सुरुवात होती आणि सुरुवात गरजेची होती, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी दिली. ते पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना राज्याबाहेर निवडणूका लढवण्यावर ठाम
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, आजही आम्ही राज्याबाहेरच्या सर्व निवडणुका लढवण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर ठाम आहोत. दरम्यान, पाच राज्यांमध्ये निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवारांचे अभिनंदन करतो असे म्हणत आमच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली त्या संर्वाचेही मी अभिनंदन करतो असही आदित्य यावेळी म्हणाले आहेत. (Shiv Sena UP Assembly Election) शिवसेनेने राज्याबाहेर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार गोवा आणि उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक लढवली. या निवडणुकांमध्ये अपयश आले असले तरी, यापुढे सातत्याने निवडणूक लढवल्यानंतर शिवसेनेबद्दल लोकांमध्ये एक विश्वासाहर्ता निर्माण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
2024 पर्यंत महाराष्ट्र मॉडेल देशासमोर नेणार !
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष पराभूत झाला. या पराभवासाठी वेगवेगळी कारणे नक्कीच असू शकतात. मात्र, प्रादेशिक पक्ष म्हणून पंजाबमध्ये आप पक्षाला यश मिळाले. तसेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सत्तेवर आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षाचा विश्वास लोकांमध्ये वाढत जाईल. (2024)च्या लोकसभा निवडणुका येण्याआधी महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी मिळून सरकार स्थापन करून एक महाराष्ट्र मॉडेल तयार केले ते महाराष्ट्र मॉडेल लोकांसमोर घेऊन जाऊ असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, या निकालामुळे महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडी सरकार लोकांसाठी लढत राहील असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाची दोन वर्षें : 'धारावी' आणि 'मुंबई मॉडेल'ने मिळवले मुंबईतील कोरोनावर नियंत्रण