मुंबई - शिंदे गटाची याचिका फेटाळून लावत न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय, अशी न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देत शिंदे गटाला ट्विटर द्वारे डिवचले.
-
सत्यमेव जयते!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आपला दसरा हा शिवतीर्थावरच!
विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय!
सन्माननीय उच्च न्यायालयाचे आभार 🙏🏻
">सत्यमेव जयते!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 23, 2022
आपला दसरा हा शिवतीर्थावरच!
विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय!
सन्माननीय उच्च न्यायालयाचे आभार 🙏🏻सत्यमेव जयते!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 23, 2022
आपला दसरा हा शिवतीर्थावरच!
विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय!
सन्माननीय उच्च न्यायालयाचे आभार 🙏🏻
सत्यमेव जयते - शिवसेनेतील बंडखोरीनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरात यात्रा काढून शिंदे गटाच्या आमदारांवर टीकेची झोड उठवली आहे. आदित्य ठाकरे यांच्या यात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला. सत्यमेव जयते, आपला दसरा मेळावा शिवतीर्थावरच, विजयादशमी म्हणजे सध्याचा विजय, सन्मानिय उच्च न्यायालयाचे आभार, असे ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त केले. शिवाजी पार्क दसरा मेळावा कोणाचा हा वाद गेल्या महिन्याभरापासून सुरू होता. शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दावा केल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने दोन्ही अर्ज फेटाळले. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात केले होते. आज त्यावर सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने मनपा आणि शिंदे गटाला खडसावत शिवसेनेला दादर मध्ये मेळावा घेण्यास परवानगी दिली. शिवसैनिकांनी यानंतर एकच जल्लोष केला.
न्यायदेवतेने विश्वास सार्थ ठरवला - शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याची 1966 सालापासूनची परंपरा आहे. आजच्या निकालाने न्यायव्यवस्थेवरील विश्वास सार्थ ठरवला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसेना प्रेमींनी वाजत गाजत, गुलाल उधळत आणि शिस्तीने या. शिवसेनेच्या तेजाला, वारशाला आणि परंपरेला गालबोल लागेल, असे कृत्य करु नका. इतर काय करतील, याबाबत नेम नाही. मात्र, आपली परंपरा जपा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. तसेच आजच्या निकालाकडे संपूर्ण जगातील बांधवांचे लक्ष लागले होते. कोरोना काळ वगळला तर शिवसेनेचा मेळावा कधीही चुकला नाही. आजच्या निकालाने न्याय देवतेचा निकाल सार्थ ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयातही लोकशाहीच्या भवितव्याचा निर्णय होईल, असे ठाकरेंनी स्पष्ट केले.