ETV Bharat / city

'त्यांनी' कायदा वाचला नाही, समीर वानखेडे प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांचा टोला - नवाब मलिक लेटेस्ट न्यूज

समीर वानखेडे (ncb officer sameer wankhede) यांच्या जात प्रमाणपत्रावरून सध्या राजकीय वातावरण रंगले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक (minister nawab malik) यांनी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र व जन्माच्या दाखल्यावरून गंभीर आरोप केले आहेत. परंतु ज्यांनी हे आरोप केले आहेत त्यांनी कायदा वाचला नाही, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (vanchit bahujan aghadi prakash ambedkar) यांनी नवाब मलिक यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Nov 20, 2021, 3:02 PM IST

मुंबई - एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे (ncb officer sameer wankhede) यांच्या जात प्रमाणपत्रावरून सध्या राजकीय वातावरण रंगले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक (minister nawab malik) यांनी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र व जन्माच्या दाखल्यावरून गंभीर आरोप केले आहेत. परंतु ज्यांनी हे आरोप केले आहेत त्यांनी कायदा वाचला नाही, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (vanchit bahujan aghadi prakash ambedkar) यांनी नवाब मलिक यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी ते बोलत असताना त्यांनी इतरही विषयांवरही भाष्य केले.

'समीर वानखडे यांची बाजू मजबूत'

ज्यांनी समीर वानखेडे यांच्या जातीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी कायदा वाचला नाही. समीर वानखेडे बरोबर आहेत. त्यांच्या जात आणि धर्माच्या मुद्द्यावर आच येईल असे वाटत नाही. समीर वानखेडे यांची बाजू भक्कम आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर

'पंतप्रधानांची नाचक्की'

शेतकऱ्यांचे आंदोलन (farmers agitation in india) यशस्वी झाले. शेतकरी नेत्यांचे अभिनंदन. कृषी हा राज्याचा विषय आहे. चार-पाच राज्यांत कायदा होत नाही, तोपर्यंत केंद्राला कायदा करता येत नाही. त्यामुळे पंतप्रधानांची नाचक्की झाली आहे, असे ते म्हणाले.

'रक्षकच भक्षक झाले आहेत'

एसटी कर्मचाऱ्यांनी संप (st employees strike) ताणू नये. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. रक्षकच भक्षक झाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त फरार आहेत. माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत. वसुलीचे आरोप गंभीर आहेत. त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. त्याचबरोबर सध्या राज्यात सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या प्रश्नावर त्यांना विचारले असता एसटी कर्मचाऱ्यांनी तुटेल एवढा संप ताणू नये, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.