मुंबई - मुंबईत मागील मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज मुंबईत 44 हजार 264 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 5 लाख 57 हजार 950 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा - मी क्राईम ब्रांचमधून मुक्त झालो - सचिन वझे
महापालिकेतील लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 21 हजार 646 लाभार्थ्यांना पहिला तर 4 हजार 629 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 26 हजार 275 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत पालिकेच्या लसीकरण केंद्रात 3 लाख 78 हजार 783 लाभार्थ्यांना पहिला तर 59 हजार 152 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 4 लाख 37 हजार 935 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
सरकारी रुग्णालयातील लसीकरण -
केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 2 हजार 7 लाभार्थ्यांना पहिला तर 300 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 2 हजार 307 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 15 हजार 428 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 134 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 17 हजार 562 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
खासगी रुग्णालयातील लसीकरण -
खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील आज 14 हजार 802 लाभार्थ्यांना पहिला तर 880 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 15 हजार 682 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 95 हजार 025 लाभार्थ्यांना पहिला तर 7 हजार 428 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1 लाख 2 हजार 453 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा - वझेंची एकाच दिवशी दुसऱ्यांदा बदली, नियंत्रण कक्षातून आता नागरी सुविधा केंद्रात