ETV Bharat / city

सायन रुग्णालयात मृतदेह अदलाबदली प्रकरणी शवागृहातील दोन कर्मचारी निलंबित - सायन रुग्णालयात ताज्या बातम्या

सायन रुग्णालयातून मृतदेहाची अदलाबदल झाल्याने अंकुशच्या नातेवाईकांना तसेच वडाळा विभागातील नागरिकांनी सायन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी केली. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. प्रकरणी शवागृहातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

सायन रुग्णालय
सायन रुग्णालय
author img

By

Published : Sep 14, 2020, 3:25 AM IST

मुंबई - दहा दिवसांपूर्वी वडाळा येथे राहणाऱ्या अंकुश सरवदे या युवकाचा अपघात झाला. काल शनिवारी त्याचा मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, त्याचा मृतदेह रुग्णालयाने इतर लोकांच्या ताब्यात दिल्याने मृतदेहांची अदलाबदल झाली. यामुळे अंकुशच्या नातेवाईकांनी व वडाळा विभागातील नागरिकांनी रुग्णालयात गोंधळ केला. याबाबात चौकशीचे आदेश देण्यात आले असून शवागृहातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

सायन रुग्णालयातील गोंधळ आणि मृताच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया

अंकुश गौतम सरवदे हा वडाळा येथे राहत होता. तो डान्सर होता. त्याचा दहा दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना अंकुशचा काल शनिवारी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह घेण्यासाठी कुटूंबीय व नातेवाईक सकाळी रुग्णालयात गेले असता त्यांना मृतदेह देण्यात आला नाही. मृतदेह दिला जात नसल्याने त्याच्या कुटूंबियांनी तगादा लावला असता दुसऱ्याच रुग्णाच्या कुटूंबियांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आल्याचे समोर आले. अंकुशच्या मृतदेहावर दुसऱ्याच रुग्णाच्या कुटूंबियांनी अंत्यसंस्कार केले. मृतदेह बंद करून देण्यात आल्याने चेहरा न बघताच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे दुसऱ्या रुग्णाच्या कुटूंबियांनी अंकुशच्या कुटूंबियांना सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि वडाळा विभागातील नागरिकांनी सायन रुग्णालयात गोंधळ घातला. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती अंकुशच्या नातेवाईकांकडून देण्यात आली.

हेही वाचा - पदवी प्रवेशाचे करायचे काय? राज्यातील विद्यापीठांपुढे संभ्रम कायम...

दरम्यान, याबाबत पालिकेच्या सायन रुग्णालयाने काहीही बोलण्याचे टाळले आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर शवागृहात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे डीन. डॉ. मोहन जोशी यांनी दिली. सायन रुग्णालयात 28 ऑगस्टला डोक्याला मार लागल्याने अंकुश सुरवडे याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो व्हेंटिलिटर वर होता. त्याचा मृत्यू झाला असता त्याचा मृतदेह शवागृहात पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. याच दरम्यान हेमंत दिगंबर नावाच्या आत्महत्या केलेल्या रुग्णांचा मृतदेहही पोस्टमार्टमसाठी शवागृहात ठेवला होता. अंकुशचे नातेवाईक सायंकाळी 4 वाजता मृतदेह घेऊन जाऊ असे सांगून निघून गेले. मात्र, त्याच वेळी हेमंत दिगंबर याचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शवागृहात आले त्यांनी चेहरा न बघता मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले.

या प्रकराबाबत निषेध व्यक्त करत अंकुशच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच अंकुशचा मृतदेह द्या म्हणून सांगत नातेवाईकांनी गोंधळ घातला. हा प्रकार सुरू आसताना पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या शवागृहाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मृतदेह अदलाबदली प्रकरणी कारवाईची मागणी केली असता शवागृहात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

हेही वाचा - एकेकाळी आयपीएलमध्ये होते 'स्टार', आता मात्र विस्मरणात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.