ETV Bharat / city

MH BREKING LIVE : 'फेक व्हॅक्सिन' देणाऱ्या रॅकेटचा भांडोफोड; 5 जणांना अटक - पावसाचा इशारा

MAHARASHTRA NEWS
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Jun 18, 2021, 7:04 AM IST

Updated : Jun 18, 2021, 6:24 PM IST

18:19 June 18

मुंबई - कांदिवली परिसरातील हाय प्रोफाइल हिरानंदानी हेरिटेज इमारतीत फेक व्हॅक्सिन देणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी भांडोफोड केला आहे. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 

16:46 June 18

कोरोनाची तिसरी लाट येण्याचा तज्ज्ञांचा इशारा

मुंबई - पुढील काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना रेल्वेने प्रवासाची मुभा देता येणार नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. तसेच पुढील आठवड्यात मुंबईतील काही निर्बंध शिथिल केले जातील. त्यासाठी उद्या बैठक आयोजित केली असल्याचेही ते म्हणाले.

16:20 June 18

  • ओबीसी आरक्षणावर भाजपा नेत्यांची देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, चित्रा वाघ, संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळे, मनीषा चौधरी उपस्थित आहेत.

16:19 June 18

  • राहुल गांधींचा वाढदिवस नागरिकांची मदत करुन साजरा करणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. त्यानुसार मुंबईसह राज्यात काँग्रेसकडून #RG द्वारे विविध उपक्रम राबवून नागरिकांना शालेय वस्तू आणि इतर साहित्यांचे वाटप केले जाणार आहे.

13:37 June 18

महाराष्ट्रात तब्बल ५३ लाख ७२ हजार २१९ जणांनी घेतले कोरोना लसीचे दोन्ही डोस

राज्यात कोरोना लसीकरणाचे प्रमाण हे देशात सर्वाधिक आहे. राज्यात सध्य स्थितीत तब्बल 53,72,219 जणांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर कोरोना लसीकरण झालेल्यांची एकूण आकडेवारी अडीच कोटी पेक्षा जास्त आहे.

12:18 June 18

मुंबईसह राज्यभरात 'साप्ताहिक लसीकरण योजना' राबवणं शक्य; लसींच्या पुरवठ्याची गरज

मुंबईसह राज्यभरात 'साप्ताहिक लसीकरण योजना' राबवणं शक्य आहे.  मात्र केंद्र सरकारकडून मुबलक लसींचा साठा उपलब्ध व्हायला हवा, अशी माहिती राज्य सरकारने  न्यायालयात दिली आहे. तसेच 'आर्थिदृष्ट्या मागास आणि स्मार्टफोन नसलेल्या नागरिकांचं थेट लसीकरण करण्याचे निर्देश जारी करण्यात आल्याचेही सा्ंगण्यात आले आहे'

12:14 June 18

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून आज 2100 क्यूसेक पाणी सोडणार

सातारा - कोयना धरण परिसरात चोवीस तासात 390 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरण प्रशासनाकडून कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून आज 2100 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. धरणाखालील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

12:13 June 18

कृष्णा नदीच्या पाण्यात वाढ कायम, पाणी पातळी पोहोचली 23 फुटांवर

सांगली - कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज सकाळी ११ पर्यंत पाण्याची पातळी पोहचली 23 फुटांवर पोहोचली आहे. तर वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे.

11:40 June 18

क्राईम पेट्रोल मालिकेमध्ये काम केलेल्या दोन महिला कलाकारांना चोरी प्रकरणी अटक

  • टीव्ही मालिकामध्ये काम करणाऱ्या दोन महिलांना चोरी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
  • आरे कॉलनी येथे राहात असलेल्या ठिकाणहून त्यांनी 3.28 लाख रुपयांची चोरी केली आहे.
  • पोलिसांनी त्यांच्याकडून ५० हजार रुपये हस्तगत केले आहेत.
  • या दोन्ही महिला आरोपींनी सावधान इंडिया आणि क्राईम पट्रोल या लोकप्रिय मालिकांमधून छोट्या भूमिका केल्या आहेत.

09:09 June 18

मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

08:16 June 18

ठाण्यात इमारतीचा भाग कोसळला; जीवितहानी नाही

ठाण्याच्या पूर्व भागातील एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना आज(शुक्रवारी) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

07:47 June 18

मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटरसाठी 102.82 रुपये आहे. तर डिझेलसाठी 94.84 रुपये प्रति लीटर

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने आजही शंभरीपारचा टप्पा कायम ठेवला आहे. वाढत्या पेट्रोलदराने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. 

06:08 June 18

रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 50 टक्क्यांनी घटवण्याचं सरकारचे उद्दिष्ट

2024 पर्यंत रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 50 टक्क्यांनी घटवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Last Updated : Jun 18, 2021, 6:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.