ETV Bharat / city

साध्या पद्धतीने साजरा होणार यंदाचा गणेशोत्सव - news about corona virus

गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी आणि त्यातून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका पाहता भाविक आणि कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असे दहिबावकर यांनी सांगितले आहे.

this-years-ganeshotsav-will-be-celebrated-in-a-simple-manner
यंदाचा गणेशोत्सव साध्यापद्धतीने होणार साजरा
author img

By

Published : May 5, 2020, 6:10 PM IST

मुंबई - गणेशोत्सवाला अजूनही दोन महिन्यापेक्षा जास्त महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. देशासह सातासमुद्रापार साजरा होत असलेल्या या उत्सवाला कोरोनाचा फटका बसणार का? अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. मात्र, या चर्चेला आता बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‌ॅड. नरेश दहीबावकर यांनी पूर्णविराम लावला आहे. गेले अनेक वर्षांचा सांस्कृतिक वारसाला कोरोनामुळे खंड पडू नये, म्हणून यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केले आहे.

या वर्षीचा गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा. प्लेगच्या साथी दरम्यानदेखील अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. मुंबई शहरासमोर कोणतेही मोठे संकट येते तेव्हा प्रत्येक वेळी मंडळांकडून सामाजिक भान जपण्यात आले आहे. गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी आणि त्यातून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका पाहता भाविक आणि कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असेही दहिबावकर यांनी सांगितले आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या काळात काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मूर्ती बनवणार कधी, असा प्रश्न अनेक मूर्तिकारांना पडला आहे. दरवर्षी मुंबईत उंच मूर्ती मुंबईत पाहायला मिळतात आणि याच मूर्ती पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र यंदा कोणत्याही गणेशोत्सव मंडळांनी उंच मूर्तीबाबत आग्रही राहू नये, असे आवाहन मूर्तिकार रेश्मा खातू यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.