ETV Bharat / city

मुंबईत यंदा उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळा पूर्व सर्व्हेक्षण नाहीच! - cessed buildings

दरवर्षी दक्षिण मुंबईतील जुन्या उपकरप्राप्त इमारतीचे सर्व्हेक्षण केले जाते. यातून अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर केली जाते.

cessed buildings in Mumbai
उपकरप्राप्त इमारती मुंबई
author img

By

Published : May 5, 2020, 8:05 PM IST

मुंबई - दरवर्षी दक्षिण मुंबईतील जुन्या उपकरप्राप्त इमारतीचे सर्व्हेक्षण केले जाते. यातून अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर केली जाते. परंतु यावर्षी मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हे सर्व्हेक्षणच झालेले नाही. त्यामुळे यावर्षी अतिधोकादायक इमारतीची यादीच जाहीर होणार नाही. मात्र, पावसाळ्यात इमारत कोसळण्याची घटना घडू नये, यासाठी सर्वोतोपरी काळजी घेतली जात असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा... मुंबई : कोरोनाबाधितांवर खासगी रुग्णालयात पालिका करणार मोफत उपचार

मुंबईतील 16 हजाराहून अधिक जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या देखभालीची आणि दुरुस्तीची जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळावर आहे. त्यानुसार दरवर्षी या इमारतीचे पावसाळा पूर्व सर्व्हेक्षण केले जात. तर यात ज्या इमारती अतिधोकादायक असतील त्यातील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवत सदर इमारती रिकाम्या केल्या जातात. कारण पावसाळ्यात याच इमारती कोसळण्याची सर्वाधिक भीती असते. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. यावर्षी मात्र याच महत्वाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या काही महिने आधी हे सर्व्हेक्षण केले जाते आणि 15 मेपर्यंत यादी जाहीर केली जाते. तर 1 जूनपर्यंत इमारती रिकाम्या केल्या जातात. पण यावषी मात्र मार्चपासूनच कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट उभे राहिल्याने सर्व्हेक्षण रखडले. परिणामी यादी रखडली आहे. त्यामुळे ही यादी जाहीर होणार नसल्याचे लोखंडे यांनी सांगितले आहे. पण पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आमच्या अभियंत्यांनी अतिधोकादायक इमारती शोधून काढल्या आहेत. त्यानुसार त्यांची दुरुस्ती केली जात आहे. त्यातही पावसाळ्याआधी एखादी इमारत खाली करणे अत्यंत आवश्यक आहे. ती इमारत खाली केली जाईल. अन्यथा कोरोनाच्या परिस्थितीत असे कोणालाही इतरत्र हलवणे शक्य ठरणार नसल्याचेही लोखंडे यांनी सांगितले आहे. मात्र, पावसाळ्यात उपकरप्राप्त इमारती पडतातच हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी यासाठीची प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.