मुंबई पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर, Chief Minister एकनाथ शिंदे Eknath Shinde गटात अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. मात्र त्या आमदारांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तरात second cabinet expansion, मंत्रिपद मिळेल अपेक्षा आहेत. मात्र दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर देखील नाराज आमदारांची नाराजी दूर न झाल्यास, शिंदे गटात देखील बंड होणाची शक्यता will be revolted आहे.
एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असला तरी, अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही. कारण मंत्रिमंडळ विस्तारानंतर ज्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही, अशा आमदारांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळावे यासाठी, एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी लॉबिंग सुरू केले होते. अब्दुल सत्तार यांचे नाव शिक्षण विभागात झालेला टीईटी घोटाळ्या प्रकरणात जोडले जात असल्याने, त्यांना या विचारात संधी मिळणार नाही असे चित्र होते. मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकत, शेवटच्या क्षणी मंत्रिमंडळात आपले स्थान पक्के केले. असेच अनेक इच्छुक एकनाथ शिंदे गटात होते. मात्र, त्यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे उघडपणे नाराजी दिसायला सुरुवात झाली आहे.
दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदारांना अपेक्षा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उघडपणे आपली नाराजी जाहीर केली. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे सगळ्यात आधी आले, त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही. मात्र, नंतर आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. यावर बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तर तिथेच एकनाथ शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी आपली नाराजी थेट उघड केली नसली तरी, मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनाही मंत्री मंडळात स्थान मिळेल अशी आशा होती. मात्र त्यांच्या पदरी देखील निराशा पडली आहे.
तर एकनाथ शिंदे गटातही बंड होईल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे भाजपात सामील झाले. या राजकीय बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सामील झाल्या पैकी बरेचसे आमदार आपला स्वार्थ साधण्यासाठी गेले आहेत. नवीन सरकार मध्ये आपल्याला मंत्रीपद मिळेल आणि त्यातल्या त्यात मलाईदार खातेही मिळेल, अशी अपेक्षा अनेक आमदारांची आहे. त्यामुळेच पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे, आमदारांची नाराजी उघडपणे पाहायला मिळाली. नाराज असलेल्या सर्व आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळेल असा शब्द अनेक आमदारांना दिला आहे. त्यामुळे जर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षा असलेल्या सर्व आमदारांना मंत्रिपद मिळाले नाही. तर, दत्ता शिंदे गटातही मोठ्या प्रमाणात नाराजी येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. आणि ज्या प्रमाणे शिवसेना पक्षात या आमदारांनी बंड केले होते. तसेच बंड पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटातही पाहायला मिळेल, असे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे गटाची सारवासारव मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटामधील आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारत ज्या आमदारांना स्थान मिळाले नाही. त्या, इच्छुक आमदारांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारत स्थान मिळेल. मात्र आमच्यात कोणीही नाराज नाही. मंत्री मंडळात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तसेच सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दुसरा विस्तार होणार असून सर्वांचे समाधान केले जाईल. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणीही आमदार काही हवे आहे म्हणून आलेला नाही तर बाळासाहेब यांच्या विचारांचा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही वेगळे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आहोत. आमच्यात कोणतीही नाराजी नसल्याचे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले आहेत.
काही मिळवण्याच्या हेतूने आमदार एकनाथ शिंदे सोबत एकनाथ शिंदे गटात गेलेल्या प्रत्येक आमदाराला अपेक्षा आहेत. मंत्रिपदाचा हव्यास किंवा केंद्रीय तपास यंत्रणेची भीती दाखवत हे आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. कोणत्याही विचाराने हे आमदार एकत्र आलेले नाहीत. म्हणून पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संधी न मिळालेल्या नाराज आमदारांची संख्या मोठी आहे. आता त्या नाराज आमदारांना पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शब्द देण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तरात देखील सर्वांचे समाधान होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज आमदारांची संख्या नक्की वाढणार असल्याचे शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायदे म्हणाल्या.
हेही वाचा Mungantiwar tweetv सुधीर मुनगंटीवार यांच्या वंदे मातरम् म्हणण्याच्या ट्वीटवर हिंदू महासभेचे समर्थन