मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची बैठक ( Cabinet Meeting ) सोमवारी (28 नोव्हेंबर) रोजी दुपारी एक वाजण्याच्या बोलवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत निर्मित झालेल्या "ओमिक्रोन" ( Omicron Variant ) या नवीन व्हेरीएंटची भीती जगभराला लागून राहिली आहे. या नवीन व्हेरीएंटचा राज्यात शिरकाव होऊ नये यासाठी उद्याच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ''ओमिक्रोन" या नवीन व्हेरीएंट अत्यंत धोकादायक असून याचा प्रसारही मोठ्या झपाट्याने होतो. यामुळेच राज्याच्या सीमा सुरक्षित करण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनीही अंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित करण्यात यावा याबाबत केंद्र सरकारकडे मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये कोणत्या दक्षता घेतल्या गेल्या पाहिजेत याबाबत उद्या बैठकीत बैठकीत चर्चा होईल.
तसेच एक डिसेंबरपासून राज्यांमध्ये पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, नवीन व्हेरिएंट अत्यंत घातक आणि वेगाने पसरणारा विषाणू असल्याने शाळेबाबतच्या निर्णयात बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी आज सायंकाळी पाच वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. साउथ आफ्रिकेत मिळालेल्या नवीन व्हेरियंटमुळे राज्यात दक्षता घेण्यात यावी याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. आज सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडणार आहे.
हे ही वाचा - Omicron Variant : 'ओमिक्रॉन' व्हॅरिएंटचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक