ETV Bharat / city

State Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीचा घेणार आढावा! - Maharashtra Monsoon Rains updates

सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. लातूरसह औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ( State Cabinet meeting ) होणार आहे.मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागणार आहे.

State Cabinet meeting
राज्य मंत्रिमंडळाची बैठक
author img

By

Published : Jul 27, 2022, 10:32 AM IST

मुंबई - आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ( State Cabinet meeting ) होणार असून या बैठकीसाठी पुन्हा एकदा केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis meeting ) यांनाच ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागणार आहे. अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे ( Cabinet did not expand ) राज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ( Chief Minister and Deputy Chief Minister ) यांच्यावरच अद्याप तरी आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास आठ हजार हेक्टर शेत जमिनीला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतील. आज दुपारी बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडेल. अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची सोबत देखील या बैठकीतून मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती ( Meeting with district collectors) आहे. यासोबतच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar demand ) यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ( Wet drought should be declared ) अशी मागणी केली होती. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांच्या या मागणीबाबत चर्चा होण्याची देखील या बैठकीतून शक्यता नाकारता येत नाही.

ठाकरे सरकारला म्हणू शकतो धक्का - आतापर्यंत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीततून एकनाथ शिंदे सरकारने तात्कालिन ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णयांना स्थगिती नवीन सरकारकडून देण्यात आली. तर महा विकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द केले. ते रद्द केलेले घेऊन नव्याने घेण्याचं काम एकनाथ शिंदे सरकार करत आहे. त्यामुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारला अजून धक्का दिला जाऊ शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज्यात जोरदार पाऊस - सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. लातूरसह औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ( Maharashtra Monsoon Rains updates ) शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस - लातूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. लातूर उदगीर मार्गाचे काम सध्या सुरु आहे. यामुळे काही ठिकाणी पर्यायी पूल बांधण्यात आले होते. कालपासून पडत असलेल्या पावसामुळे चांभरगा गावाजवळ लहान ओढ्यात पाणी आल्याने सिमेंटचे मोठे पाईप टाकून बांधण्यात आलेला पर्यायी पुल देखील वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. नरसिंगवाडी पाटी येथील पर्यायी पूल पावसामुळे वाहून गेला आहे. ( Maharashtra Monsoon Rains updates ) यामुळे हा रस्ता बंद आहे. या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे उदगीरसह चामरगा, बावलगाव, जंगम वाडी, वेरूळसह अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.

औरंगाबाद शहरात जोराचा पाऊस - खुलताबाद तालुक्यात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. खुलताबाद तालुक्यात कसाबखेडा गाव आणि परीसरात झालेल्या पावसाने गावाजवळील पूल वाहून गेल्याने तब्बल 6 गावांचा संपर्क तुटला आहे. कसाबखेडा गावाशी माटेगाव,चांभारवाडी, देभेगाव, देवळाणा, पिंपळगाव या गावातील लोकांचा दैनदीन व्यवहार असल्यानं दररोजचा संपर्क आहे. कसाबखेडा परीसरातील अनेक शेतकरी शेतात वास्तव्यास आहेत. गावात शाळा, बँक, दवाखाने आणि मोठी बाजारपेठ आहे. ( Maharashtra Monsoon Rains updates ) कसाबखेडा परीसरातील शेतकरी आणि माटेगाव, चांभारवाडी, विटखेडा,देभेगाव ,देवळाना पिंपळगाव या गावातील लोकांची वर्दळ गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पुलावरुन होत असते. मात्र, मुसळधार पावसामुळं नळकांडी पूल वाहून गेला आहे. त्यामुळं या गावातील नागरीकांच्या दळणवळणाची मोठी समस्या निर्माण होऊन कसाबखेडा गावाशी संपर्क तुटला आहे.

हेही वाचा - State Wrestling Association : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत शरद पवारांना धक्का; भाजपचे खासदार रामदास तडस होणार अध्यक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.