मुंबई - शिवसेना नेते तथा खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale ) यांच्या विरोधात बलात्काराचे आरोप ( Rape allegations against MP Rahul Shewale ) करणाऱ्या महिला विरोधात गुन्हा दाखल ( case has been registered against the woman ) करण्याचे निर्देश अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ( Andheri metropolitan magistrate court ) शनिवार रोजी दिले आहे या प्रकरणात साकीनाका पोलिसांनी महिलेविरोधात आज गुन्हा दाखल ( case has been registered against the woman ) केला आहे. दोन महिन्यापूर्वी महिलेने राहुल शेवाळे यांच्या विरोधात साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता तक्रार दिली होती.
हेही वाचा - पतीसोबत झालं भांडण, 'ती' आली अन् मुलासह कृष्णेत उडी मारणार तेवढ्यात...; कराडमधील थरारक घटना
महिलेविरोधात गुन्हा - खासदार राहुल शेवाळे यांनी 12 मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती. त्यानंतर कोर्टाने सुनावणी करत महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे या आरोपाखाली साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर महिलेच्या विरोधात साकीनाका पोलीस अधिक तपास करत आहे. एप्रिल महिन्यात या महिलेने खासदार शेवाळे यांच्याविरोधात आरोप केले होते. त्यावेळी राहुल शेवाळे यांनी हे आरोप फेटाळून लावले. या महिलेने केलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा डागाळण्यासाठी आणि खंडणी वसुलीसाठी हे आरोप करण्यात आल्याचा दावा शेवाळे यांनी केला होता. मुंबई पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, याआधी शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावरदेखील एका युवतीने बलात्काराचा आरोप केला होता. त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला होता. त्यानंतर या पीडित युवतीने आपल्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोप करण्यासाठी दबाव टाकला असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली होती. तर, चित्रा वाघ यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.
हेही वाचा - Pulwama Attack : पुलवामात दहशतवाद्यांचा जवानांच्या पथकावर हल्ला.. एका जवानाचा मृत्यू..