ETV Bharat / city

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ठाणे न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

author img

By

Published : Oct 28, 2021, 7:55 PM IST

परमबीर सिंग यांच्याविरोधात नॉन बेलेबल अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांच्यासह 28 जणांवर खंडणी उकळण्याचा गुन्हा ठाणेनगर पोलिसांनी दाखल केला होता. त्यानंतर ते चौकशीस सतत गैरहजर राहत आहेत.

Parambir Singh
परमबीर सिंग

ठाणे - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात नॉन बेलेबल अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांच्यासह 28 जणांवर खंडणी उकळण्याचा गुन्हा ठाणेनगर पोलिसांनी दाखल केला होता. त्यानंतर ते चौकशीस सतत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे आता ठाणे न्यायालयाने सिंगविरोधात वॉरंट काढले आहे. त्यामुळे आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली असून, ते फरार घोषित होण्याच्या वाटेवर आहेत.

thane
अटक वॉरंटची प्रत

हेही वाचा - या कारणांमुळे आर्यनला मिळाला जामीन, मुकूल रोहतगी यांनी असा केला युक्तिवाद

  • 29 जणांवर आहेत गुन्हे दाखल -

परमबीर सिंग यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात भादवी ३८४, ३८६, ३८७, ३८९, ३९२, ३२४, ३२३, ५०६, ५०६(२), १६६, १०९, १२०(ब) आणि आयपीसी ३, २५, आर्म्स कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तब्बल २९ जणांचा समावेश आहे. प्रदीप शर्मा, पोलीस उपायुक्त पराग मणेरा, दीपक देवराज, एन. टी. कदम, ठाणे खंडणी विरोधी पथकाचे माजी वरिष्ठ अधिकारी राजकुमार कोथीमिरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस कर्मचारी चौधरी, विकास दाभाडे, रितेश शहा, दिपल अग्रवाल, रवी पुजारी, संजय पुंनमिया, अनिल सिंग, बच्ची सिंग, जुबेर मुजावर, सुनील देसाई, मनीष शहा उर्फ चोटी, किशोर अग्रवाल, बरखा अग्रवाल, समाजसेवक बिनू वर्गीस, तारीख परवीन, देवा भानुशाली, अंकित भानुशाली, विशाल कारिया, प्रदीप सोदानी, प्रशांत कोठारी, दीपक कपूर, नागेश यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे कोपरी पोलीस ठाण्यातही परमबीर सिंग यांच्याविरोधात दोन कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, ४२०, ३६४ ए, ३४, १२० बी नुसार दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तक्रारदार केतन तन्ना आणि रियाज भाटी यांनी पोलीस ठाण्यात जबाबही नोंदवले होते.

  • काय आहे प्रकरण?

ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन साडेतीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जालान, रिजाय भाटी आणि केतन तन्ना यांनी केला होता. या प्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सिंग यांना वारंवार निर्देश देऊन देखील ते चौकशीस हजर राहत नसल्याने अखेर ठाणे न्यायालयाचे मुख्य न्याय दंडाधिकारी आर. जे. तांबे यांनी मंगळवारी परमबीर सिंग विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी केले.

या दोन्ही गुन्ह्यात परमबीर सिंग हे फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू असतानाच गुरुवारी ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश आर. जे. तांबे यांनी ठाणेनगर पोलिसांना परमबीर सिंग यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. याबाबतची सूचना ठाणेनगर पोलिसांना देण्यात आली.

  • परमबीर सिंग यांना न्यायालयात हजर करा-

कोपरी आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यात दोन खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर ठाणे न्यायालयात याबाबत सुनावणीत न्यायालयाने परमबीर सिंग यांच्याबाबत विचारणा केली. त्यानंतर न्यायालयात ठाणेनगर पोलीस आणि सीबीआय यांनी त्यांच्या मूळगावी तपास केला. मात्र, ते आढळून न आल्याचा अहवाल सादर केला. यावर ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांच्या विरोधात अटक वॉरंट जरी करून त्यांना अटक करून न्यायालयात हजर करा, असे आदेश मुख्य न्यायधीश आर. जे. तांबे यांनी दिले.

हेही वाचा - पंचांची विश्वासार्हता नसल्याने एनसीबीची बाजू कमकुवत..!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.