मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून तसेच राज्याच्या बाहेरुन कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मातोश्रीवरती गर्दी करत आहेत. आज तेलंगणावरुन आलेल्या कार्यकर्त्यांनीही त्यांना शुभेच्छा देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन दिले.
तेलंगणावरुन आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भारताच्या सुरक्षेसाठी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपले आयुष्य वाहिले. अशा नेत्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच आज उद्धव याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे निवेदन त्यांना देणार आहोत. त्यांनी यात लक्ष घालावे, अशी विनंती ही करणार आहोत, असेही या कार्यकर्त्यानी सांगितले.