मुंबई- शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबई पोलीस महासंचालकांची कार्यालयात ( Shiv Sena Delegations Met DGP ) जाऊन शिवसैनिकांवर होत असलेल्या कारवाई विरोधात पत्र दिले आहे. पुण्यामध्ये माजी मंत्री उदय सामंत ( Former Minister Uday Samant ) यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये निरार्थक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल ( Crimes filed against Shiv Sainiks ) करून त्यांना फसवण्यात येत असल्याचे या निवेदनामध्ये म्हटले आहे. दरम्यान शिवसैनिकांवर होत असलेले गुन्हे याबाबत शिवसेना शिष्टमंडळ पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे.
पोलीस महासंचालकांची भेट - शिवसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्यांच शिवसेनेकडून म्हणण्यात आलं आहे. तसेच सर्व गुन्हे मागे घेण्याची शिवसेसेना शिष्टमंडळ मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालकांची भेट घेत गुन्हे मागे घेण्याची विनंती करणारे निवदेन दिले. यावेळी आमदार निलम गोऱ्हे, खासदार विनायक राऊत, मनिषा कायंदे तसेच आमदार सचिन आहिरसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पुण्यात बुधवारी रात्री माजी मंत्री व आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला. यानंतर हल्ला करणारे हे शिवसैनिक होते असा दावा उदय सामंत यांनी केला होता.
हेही वाचा - Manisha Kayande : एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि शिवसैनिक भाजपाच्या दावणीला बांधायचे आहे - मनीषा कायंदे
त्यांनी तशी पोलिसात तक्रार दाखल लेली होती त्यानंतर काही संशयित शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केले हेते. तसेच काहींवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले. दरम्यान तानाजी सांवत यांच्यावर हल्ला करायचा होता, पण उदय सामंत यांच्या गाडीवर सावंत समजून शिवसैनिकांनी हल्ला केला असं सुद्धा बोललं जात आहे. या घटनेनंतर अनेक शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याविरोधात शिवसेना सुद्धा आक्रमक झाली आहे.
हेही वाचा - Rahul Gandhi : राहुल गांधींचं मोदींना थेट चॅलेंज.. म्हणाले, 'काय करायचं ते करा, मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही..'