मुंबई- विधानसभेचे विशेष अधिवेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलैला होणार आहे. यापूर्वी मंत्रिमंडळाने 2 आणि 3 जुलै रोजी 2 दिवसांसाठी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा ( special session of the Maharashtra legislature ) निर्णय घेतला होता. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात ( first cabinet meeting of MH gov ) आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभापती निवडी पूर्ण होणार ( Assembly speaker selection ) आहेत. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून सभापतीपद रिक्त राहिलेले आहे. मुंबई महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन ३ जुलैपासून होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार ( Maharashtra assembly speaker election ) आहे. या अधिवेशनादरम्यान ४ जुलैला विश्वासदर्शक ठराव होणार आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री? मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास प्रकल्पांना गती देण्याची गरज असल्याचे सांगितले. निवडून आलेले प्रतिनिधी आणि प्रशासनाने हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे. मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अनुभवी असल्याने प्रशासनाला मदत होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. फडणवीस यांनी नोकरशाहीला प्रशासकीय निर्णय लवकर घेण्यास सांगितले, असे निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यात सुरू असलेल्या पेरणीच्या कामांचाही आढावा घेतला.
अचानक देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ-एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली ( Eknath Shinde Oath Maharashtra Chief Minister ) शुक्रवारी शपथ घेतली आहे. तर, मुख्यमंत्रीपदासाठी आधी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अचानक आता देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ( Devendra Fadnavis Oath DCM ) आहे.
ठाकरे सरकारचे निर्णय अवैध-ठाकरे सरकारने ( Thackeray Government ) अल्पमतात असताना कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय अवैध ठरतात. तरीही त्यातील बऱ्याच निर्णयांशी आम्ही सहमत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील बड्या सत्तातंरावर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद ( Thackeray Government Cabinet Decision Invalid Say Devendra Fadnavis ) घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला - भाजपाकडे मोठ्या प्रमाणात संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला, आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. आम्ही फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे सांगितले.
विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवारी होणार-महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवारी ३ जुलै आणि सोमवारी ४ जुलै २०२२ रोजी बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असून अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दिनांक २ जुलै, २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, दिनांक ३ जुलै, २०२२ रोजी सभागृहात होईल. विधानसभेच्या सर्व सदस्यांनी याची कृपया नोंद घ्यावी आणि या विशेष अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विभागाने केले आहे.
हेही वाचा-Eknath Shinde : "माजी मुख्यमंत्रीही सोबत त्यामुळे..."; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया