मुंबई - दक्षिण मध्य रेल्वेने काही गाड्या बंद केल्या आहेत. तर, काही गाड्यांचा मार्ग बदलला आहे. गेली चार दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे, दिक्षिण रेल्वेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
या गाड्या बंत केल्या आहेत
गाडी नंबर (07 416) कोल्हापूर एससीएसएमटी ते तिरुपती ही गाडी कोल्हापूर ते मिरज दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
गाडी नंबर (08047) हावडा ते वास्को दा गामा ही गाडी हुबळी ते वास्को दा गामा दरम्यान रद्द केली आहे.
या गाड्यांचे मार्ग बदलले आहेत
गाडी नंबर (06335) गांधीधाम ते नागरकोईल ही गाडी सुरत, जळगाव, बल्हारशाह, गुदुर, शोरानू या मार्गी वळवण्यात आली आहे.
गाडी नंबर (04695) कोचुवेली ते अमरितसर ही गाडी मंगलुरू, हसान, आर्सेकेरे, गुंतकल, वाडी, सोलापूर दौड, मनमाड जळगाव, उधना या मार्गावरुन वळवण्यात आली आहे.
गाडी नंबर (02978) अहमदाबाद ते एरणाकुलम या गाड्या सुरत, जळगाव, वर्धा बल्हारशाह, विजयवाडा, इरोड, शोरानू या मार्गावरून वळवण्यात आली आहे.
गाडी नंबर (04560) चंदीगड ते कोचुवेली ही गाडी रतलाम, भोपाळ, बल्हारशाह, विजयवाडा, इरोड, शोरानू या मार्गी वळवण्यात आली आहे.