ETV Bharat / city

#coronavirus : मुंबईतील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा - सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

महापालिका प्रशासन आणि पोलिसही याची दखल घेत नसल्याने स्थानिक रहिवाशांनी काही व्हिडिओंच्या माध्यमातून मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. या परिसरात फेरीवाले 'लॉकडाऊन खुल गया है' असे ओरडत असल्याचा एक व्हिडिओ सध्या पुढे आला आहे.

Social distancing rules are violated in hotspot area of ​​Mumbai
मुंबईतील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
author img

By

Published : Apr 29, 2020, 6:42 PM IST

मुंबई - शहरातील हॉटस्पॉट क्षेत्रात अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम आणि विलेपार्ले पश्चिम असे विभाग येतात. येथील जुहू गल्ली आणि जोगेश्वरी ओशिवरा जवळील बेहराम बाग, स्काऊट कंपाऊंड, कदम नगरचे काही रहिवाशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

मुंबईतील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा...

हेही वाचा... खबरदार! मास्क न घातल्यास आता होणार पाच हजारांचा दंड..

हॉटस्पॉट क्षेत्र असूनही येथील काही रहिवासी नियमांचे पालन करत नसल्यामुळे परिस्थिती भयानक होत आहे. यासंदर्भात पोलिसांकडे आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

महापालिका प्रशासन आणि पोलिसही याची दखल घेत नसल्याने स्थानिक रहिवाशांनी काही व्हिडिओंच्या माध्यमातून मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. या परिसरात फेरीवाले 'लॉकडाऊन खुल गया है' असे ओरडत असल्याचा एक व्हिडिओ सध्या पुढे आला आहे.

मुंबई - शहरातील हॉटस्पॉट क्षेत्रात अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम आणि विलेपार्ले पश्चिम असे विभाग येतात. येथील जुहू गल्ली आणि जोगेश्वरी ओशिवरा जवळील बेहराम बाग, स्काऊट कंपाऊंड, कदम नगरचे काही रहिवाशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

मुंबईतील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा...

हेही वाचा... खबरदार! मास्क न घातल्यास आता होणार पाच हजारांचा दंड..

हॉटस्पॉट क्षेत्र असूनही येथील काही रहिवासी नियमांचे पालन करत नसल्यामुळे परिस्थिती भयानक होत आहे. यासंदर्भात पोलिसांकडे आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

महापालिका प्रशासन आणि पोलिसही याची दखल घेत नसल्याने स्थानिक रहिवाशांनी काही व्हिडिओंच्या माध्यमातून मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. या परिसरात फेरीवाले 'लॉकडाऊन खुल गया है' असे ओरडत असल्याचा एक व्हिडिओ सध्या पुढे आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.