मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. मात्र, शिवसैनिकांवर ( Shivsena party workers support to Aditya thackeray ) याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. आदित्य ठाकरे यांच्या ( Uddhav Thackeray support ) राज्यभरातील शिवसंवाद यात्रेने, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परळमधील सभेने शिवसैनिकांची साथ मोठ्या प्रमाणावर असल्याचे दाखवून दिले. शिवसैनिकांच्या या शक्तिप्रदर्शनामुळे शिंदे गटात गेलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा - Fraud Mobile Crime gang : महागडे मोबाईल स्वस्तात विकणाऱ्या टोळीचा सोशल मीडियावर पर्दाफाश
कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार सोबत घेऊन बंडखोरी केली. राज्यात यानंतर मोठे उलथापालथ झालेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. आजवरचा शिवसेनेतील हा ऐतिहासिक बंड. शिंदेंच्या बंडानंतर खासदार, आजी - माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले. या सर्व गोंधळात दिवसागणिक शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यामुळे एकाकी पडले. मात्र, कट्टर शिवसैनिक एकनिष्ठ असून आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. शिवसैनिकांवर या बंडाचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.
बंडखोर आमदार, खासदारांचे धाबे दणाणलेत - सेनेतील बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली. राज्यभरात निघालेल्या यात्रेला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बंडखोरांच्या मतदारसंघातही जल्लोषात स्वागत केले जात आहे. पक्षनिष्ठा आणि व्यक्ती निष्ठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत. उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांचा पाठिंबा वाढू लागल्याने बंडखोर आमदार, खासदारांचे धाबे दणाणले आहेत.
उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक - शिंदे यांनी बंडखोरीनंतर पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. निवडणूक आयोगाने कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबईतील काळाचौकी येथील अभुदयनगर येथील सेनेच्या शाखेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ठाकरे यांनी यावेळी जोरदार घणाघात केला. ठाकरेंव्यतिरिक्त शिवसेना यांना करायचे आहेत. मात्र, या सगळ्या कारस्थानाला जल्लोष आणि उत्तर देऊन चालणार नाही. प्रत्येक पदाधिकाऱ्याचे, माझ्यासह गटप्रमुखांचे शपथपत्र मला पाहिजे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. परळ येथे शिवसैनिकांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ आता उद्धव ठाकरेही महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यामुळे, शिंदे यांच्या बंडाचा राज्यात प्रभाव पडेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - Nawab Maliks Bail Application : नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाची उद्या होणार सुनावणी