ETV Bharat / city

VIDEO : लेकीच्या लग्नात संजय राऊत यांनी लँबॉर्गिनीच्या गाण्यावर 'असा' धरला ठेका... - सुप्रिया सुळे

शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay raut) मुलगी उर्वशीच्या लग्नात व्यस्त आहे. त्यांच्या मुलीचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Thane collector Rajesh Narvekar) यांचा मुलगा मल्हार यांच्याशी होणार आहे. त्यानिमित्ताने आयोजित संगीत कर्यक्रमात संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा डान्स करताना व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Shivsena mp Sanjay raut
Shivsena mp Sanjay raut
author img

By

Published : Nov 28, 2021, 1:25 PM IST

Updated : Nov 28, 2021, 2:56 PM IST

मुंबई - आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay raut) सध्या मुलगी उर्वशीच्या लग्नात व्यस्त आहे. यानिमित्ताने रेनिसंस हॉटेलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन राऊत कुटुंबियाकडून करण्यात आले आहे. संगीत कार्यक्रमात त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत (Supriya Sule) ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

संजय राऊत यांनी लँबॉर्गिनीच्या गाण्यावर असा धरला ठेका
राऊत यांची कन्या पूर्वशी हिची मल्हार नार्वेकर यांच्याशी उद्या लग्नगाठ बांधली जाणार आहे. काही दिवसापूर्वी यांचा साखरपुडा सोहळा पार पडला होता.मल्हार नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Thane collector Rajesh Narvekar) यांचे सुपुत्र आहेत. मुंबईतील रेनिसंस या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

लग्न सोहळ्याला बड्या नेत्यांची हजेरी
लग्नाआधी आयोजित करण्यात आलेल्या संगीत कार्यक्रमात अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या आग्रहास्तव संजय राऊत यांनी ठेका धरत डान्स केला. यानंतर वर्षा राऊतांनी पतीसह डान्स केला. यानिमित्ताने पुन्हा एकदा संजय राऊत आणि पवार कुटुंबातील स्नेहसंबंध समोर आले आहेत.संगीत कार्यक्रमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे .कै. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातील ‘दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने’ हे गाणं सादर केलं या गाण्याच्या बोलाने राउत कुटुंबीय भावुक झाल्याचे दिसून आले.

कोण आहेत मल्हार ?
राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा समारंभ काही दिवसापूर्वीच झाला आहे. राऊत यांचा होणार जावई ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव आहे. राऊत यांच्या प्रमाणे राजेश नार्वेकर देखील त्यांच्या क्षेत्रामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.
हेही वाचा - CM Uddhav Thackeray : कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आमचे काम अखंड सुरू राहील : मुख्यमंत्री

Last Updated : Nov 28, 2021, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.