मुंबई : शिवसेनेतील दुफळीनंतर शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने (Shiv Sena and Shinde faction head to head) आले आहेत. शिंदे गटाकडून होणाऱ्या आरोपांना शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर (Shiv Sena response to Shinde faction allegations) दिले आहे. दहिसरमधील नागरी सत्कार समारंभात (Vinayak Mete Dahisar ceremony) शिवसेना नेते विनायक राऊत यांनी शिंदे गटावार आक्षेपार्ह टीका (Vinayak Raut criticism of Shinde faction) केली. शिवसेना संपवून नाव पुसून टाकायचा शिंदे गटाचा डाव हाणून पाडण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे आवाहन राऊत यांनी शिवसैनिकांना केले.
विनायक राऊतांची बोचरी टीका शिंदे गटाच्या जिव्हारी - बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरोधात सुरतमध्ये जाऊन बंड केला. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट असा वाद रंगला आहे. दोन्ही गटात आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत. दहिसरमध्ये शिवसेनेकडून नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेते आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकटे पाडायचे, शिवसेना संपवायची, शिवसेना नाव पुसून टाकायचे, असा डाव सुरु आहे. ४० गद्दारांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा धंदा सुरु आहे. तो उधळून लावून ही शिवसेना केवळ बाळासाहेबांची, उद्धव ठाकरेंची आहे. तुमच्या बापजाद्याची कधी होऊ शकत नाही, हे दाखवून देण्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असे राऊत म्हणाले.
किती आले, किती गेले शिवसेना संपलेली नाही - एकनाथ शिंदेंना मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेल्याची आता आठवण झाली. तो देखील गुवाहाटी, सूरतला जाऊन आल्यावर आठवला, अशी टीका विनायक राऊत यांनी केली. किती आले, किती गेले शिवसेना संपलेली नाही, शिवसेना आणखी वाढली, असे सांगत राऊत यांनी शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच वेदांता प्रकल्पावरुनही शिंदेंना लक्ष्य केले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला पाठवण्यचे काम शिंदेंनी केले. या अडाण्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या हुशार, अभ्यासू व्यक्तीला काम करावे लागत आहे. फडणवीस यांची अवस्था दुधाची तहान त्यांना ताकावर भागवावी लागत असल्याचा खोचक चिमटा राऊत यांनी काढला.