ETV Bharat / city

Uddhav Thackeray : आतापर्यंत गुलाब पाहिले, आता काटे पाहा; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांसह भाजपला इशारा - उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

आतापर्यंत तुम्ही फुल, पाहिलं गुलाब पाहिलंत. आता काटे बघाल. भाजपला हे सर्व गुलाबाचं झाड वाटत होतं. त्यांनी झाडावरची फुलं तोडून नेली. पण, संपूर्ण झाड माझ्याकडे आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं ( Uddhav Thackeray Warning Shinde Camp Rebel MLA ) आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
author img

By

Published : Aug 3, 2022, 8:46 PM IST

Updated : Aug 3, 2022, 9:55 PM IST

मुंबई - शिवसेनेने ताकद देऊन आतापर्यंत अनेक जणांना मोठं केलं. ज्यांना जाण आहे ते माझ्यासोबत राहिले जे विसरले ते आज कुठे आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. ज्यांना मोठं केलं ते आज माझ्यासोबत नाहीत. पण, ज्यांच्या जोरावर हे नेते मोठे झाले ती जनता माझ्यासोबत आहे. एक गुलाबाचे झाड आहे. त्याचे आतापर्यंत तुम्ही फुल, पाहिलं गुलाब पाहिलंत. आता काटे बघाल. भाजपला हे सर्व गुलाबाचं झाड वाटत होतं. त्यांनी झाडावरची फुलं तोडून नेली. पण, संपूर्ण झाड माझ्याकडे आहे. आता या झाडाचे काटे तुम्हाला बोचतील, असा इशारा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपला दिला ( Uddhav Thackeray Warning Shinde Camp Rebel MLA )आहे. ते मातोश्रीवर आलेल्या जळगावच्या कार्यकर्त्यांशी बोलत होते.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करताना

'आपली लढाई 2-3 पातळीवर सुरू आहे ' - सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं, हा सर्व घटनात्मक पेच आहे. आपली वकिलांची टीम आपला किल्ला भक्कमपणे लढवत आहेत. भक्कमपणे आपली बाजू मांडत आहेत. न्यायालयाच्या निर्णयावर आपल्याला पूर्ण विश्वास आहे. निकाल आपल्याच बाजूने लागेल. सध्या आपण दोन तीन पातळ्यांवर लढत आहोत. ही फक्त न्यायालयीन लढाई नाही, निवडणूक आयोगाची सुद्धा यात महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे न्यायालय त्यांचं काम करेल. न्यायालय जो निकाल देईल त्याची वाट पाहू. पण या सर्व काळात तुम्ही देखील गाफील राहू नका. आपापली तयारी पूर्ण करा पुढचा काळ अधिक संघर्षाचा आहे.

'भाजपचा वंश नेमका कोणता?' - कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर देखील हल्लाबोल केला आहे. हे राजकारण आहे येथे हार आणि जीत दोन्ही होत असतात. येथे एकाला जिंकण्यासाठी दुसऱ्याला हरवावं लागत. पण, आजपर्यंतच्या राजकारणाच्या इतिहासात कोणी कोणाचं राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा केलेली नाही. जो दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो, तोच इथं संपत असतो. हा राजकारणाचा इतिहास आहे. भाजपचा वंश नेमका कोणता? सगळे रेडीमेड आहेत. हायब्रीड आहेत. भाजपकडे स्वतःचा वंश नाही जे काही आहेत ते विकत घेतलेला वंश आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.

हेही वाचा - Prithiviraj Chavan : शिवसेना कोणाची?, सर्वोच्च न्यायालयाची तारीख-पे-तारीख; पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी, म्हणाले...

Last Updated : Aug 3, 2022, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.