मुंबई - सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची चढाओढ चालू आहे. दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर अखेर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे तसेच राहूल शेवाळे यांसह शिवसेनेचे बडे नेते राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले. एकिकडे संबंधित भेटीसंदर्भात फोटोज् सर्वत्र व्हायरल होत असतानाच दुसरीकडे मात्र दादर मधील शिवसेना भवनासमोर शुकशुकाट आहे.
शिवसेना राष्ट्रवादी तसेच काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच सेना भवनवर अद्यापही सन्नाटा आहे.