ETV Bharat / city

Dussehra Melawa : दसरा मेळाव्यात शिवसेनेची बाजी, मुंबई महापालिका कोणाच्या ताब्यात राहणार? - Shiv Sena victory in the Dussehra gathering

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दसरा मेळाव्यातील ( Dussehra Melawa ) गर्दी शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ( Response to Shiv Sena Dussehra rally ) पाहता, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ( Mumbai Municipal Corporation Election ) शिवसेनेला संघर्ष करावा लागणार असला तरी त्यांचे अस्तित्व नक्कीच जाणवेल.

Dussehra Melawa
दसरा मेळावा
author img

By

Published : Oct 6, 2022, 6:33 PM IST

मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळाव्यानंतर ( Dussehra Melawa of Shiv Sena ) नेमकं शिवसेना कोणाची या प्रश्नाची उकल झाली असून, निवडणूक आयोगाकडे काहीही निकाल लागला तरी, जनतेच्या मनात मात्र बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी निर्माण केलेली शिवसेनाच ( Shiv Sena ) आहे. याची प्रचिती दोन्ही दसरा मेळाव्यानंतर आली. अशा प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केल्या आहेत. मुंबईत झालेल्या दोन्ही दसरा मेळाव्यानंतर जनतेच्या मनात कोणाला स्थान आहे याची उकल झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी येथील मैदानावर गर्दी जमवण्यात बाजी मारली. बीकेसीचा मैदानावर दीड लाखांपेक्षा अधिक लोक जमा झाले होते. मात्र, ही केवळ गर्दी होती निष्ठावान कार्यकर्ते या सभेला दिसले नाहीत. अशी प्रतिक्रिया जेष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे. या दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मांडलेले मुद्दे त्यांची देहबोली, लांबलेले भाषण यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जाणवला नाही. एकनाथ शिंदे यांच्या भाषणात तेच तेच मुद्दे वारंवार येत होते तसेच त्याच्यात आक्रमकपणा नव्हता. असेही भावसार यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे आक्रमक आणि आश्वासक - एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांनी अतिशय संयमी, जोरदार भाषण केले. त्यांच्या भाषणात उत्स्फूर्तपणा, आक्रमकपणा दिसून आला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाजपाची चिरफाड केली. भाजपाच्या हिंदुत्वावर अनेक प्रश्न उपस्थित करून भाजपच्या हिंदुत्वालाही आव्हान देण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक शैलीचा शिवसैनिकांवर मोठा प्रभाव झाल्याचे दिसून येत होते.

शिवसेनेला मुंबईत अस्तित्व दाखवण्याची संधी - दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दसरा मेळाव्यातील गर्दी शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ( Response to Shiv Sena's Dussehra rally ) पाहता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ( Mumbai Municipal Corporation Election ) शिवसेनेला संघर्ष करावा लागणार असला तरी त्यांचे अस्तित्व नक्कीच जाणवेल. असेही भावसार यांनी सांगितले. या मेळाव्यातील जनतेच्या प्रतिसादाचे रूपांतर अंधेरी येथील पोट निवडणुकीत पाहायला मिळू शकते असेही ते म्हणाले.

पहिला सामना बरोबरीत -दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही तक्रार मिळाल्यानंतर संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषण ते जोशी यांनी सांगितले की शिवसेनेचा शिवाजी पार्क येथील मेळावा. बीकेसी येथील झालेला मेळावा पाहत दोन्ही मेळाव्यांची गर्दी ही तुल्यबळ होती म्हणजे पहिला सामना हा बरोबरीत सुटला आहे. असे म्हणता येईल या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबावर प्रहार केला तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा कार्यप्रणालीवर प्रहार करीत थेट आघात केला आहे. एकूणच आताही संघर्षाची सुरुवात आहे असे म्हणता येईल.

अंधेरी पोटनिवडणूक निवडणुकीत होणार संघर्ष - मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना भाजपा, शिंदे गट यांच्या जोरदार लढत होणार आहे. शिंदे गटाला मुंबईत किती जागा मिळतात यावर त्यांचे मुंबईतील अस्तित्व जरी अवलंबून असते तरी त्याआधी अंधेरी येथील पोटनिवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या पोटनिवडणुकीत आणि आपली ताकद जमवायला सुरुवात केली असून या मतदारसंघात मराठी माणसांपेक्षा इतर भाषिकांची संख्या अधिक असल्याने या मतदारसंघात आता विजय होतो ही मुरजी पटेल बाजी मारतात यावरच पुढील गणित अवलंबून असल्याचे जोशी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.