मुंबई - तुम्ही कधीही या, पंधरा तासांनी जरी आले तरी आम्ही इथेच आहोत. आम्ही तुमची वाट बघत आहे. शिवसैनिक ( Vinayak Raut news Mumbai ) तुम्हाला प्रसाद देतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते विनायक राऊत ( Vinayak Raut on Navneet Rana visit to Matoshree ) यांनी दिली.
मोहित कंबोज हेरगिरी करण्यासाठी आला होता. ही भाजपची कूटनीती आहे. आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत. त्यांनी केलेल्या कामावर पाणी फिरण्यासाठीच हे भाजपचे षडयंत्र आहे, असे विनायक राऊत म्हणाले. त्याचबरोबर, तुम्ही कितीही प्रयत्न करा, आमचे शिवसैनिक तयार आहेत. इथं तणाव निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा हा भाजप नेत्यांचा डाव आहे आणि तो आम्ही हाणून पाडू, असेही विनायक राऊत म्हणाले.
शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या इमारतीत घुसले - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर पोहचून हनुमान चालीस वाचणार असल्याचे सांगितले होते. वेळ होऊनही ते मातोश्रीवर न पोहचल्याने शिवसैनिक त्यांच्या इमारतीत घुसले. तसेच त्यांना बाहेर येण्याचे आवाहन केले आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून पोलिसांचा मोठा ताफा तैनात आहे.
खार येथील घराला वेढा - शिवसेना हिंदुत्व विसरले, हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणारच, असे राणा दाम्पत्याने ( Navneet rana Mumbai House ) आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. यानंतर पुन्हा एकदा मातोश्रीच्या ( Navneet rana Matoshree visit Mumbai ) परिसरात शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांची गर्दी वाढत गेली. आक्रमक शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार येथील घराला वेढा घातला. राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांसोबतच मुंबई पोलिसांचा देखील पहारा आहे. त्यामुळे, मुंबई पोलिसांचे कवच व शिवसैनिकांची नजर चोरून खरंच राणा दाम्पत्य मातोश्रीवर ( Navneet Rana will recite Hanuman Chalisa at Matoshri ) येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - Mahaprasad by Shivsena at Matoshree : मातोश्रीबाहेर महाप्रसादाचे वाटप करणार.. शिवसेनेचा सूचक इशारा