ETV Bharat / city

Anil Parab ED Inquiry : शिवसेना दुहेरी संकटात; अनिल परब यांची सहा तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू - Anil Parab Interrogated For 6 Hours

शिवसेनेला आता दुहेरी संकटाचा सामना ( Shiv Sena Facing a Double Crisis ) करावा लागत आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड, तर दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे ( CM Thackeray ) यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे परिवहनमंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांना चौकशीकरिता कार्यालयात बोलावले होते. त्यानुसार अनिल परब आज ईडी कार्यालयात दाखल ( Parab Filed in ED Office ) झाले आहे. गेल्या 6 तासांपासून अनिल परब यांची ईडीचे अधिकारी यांच्याकडून चौकशी ( Anil Parab Interrogated For 6 Hours ) सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते दुहेरी संकटात पाहायला मिळत आहे. ( Shiv Sena Leader in Double Crisis )

Transport Minister Anil Parab
परिवहन मंत्री अनिल परब
author img

By

Published : Jun 21, 2022, 5:38 PM IST

मुंबई : शिवसेनेला आज दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड तर दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे परिवहनमंत्री अनिल परब यांना चौकशीकरिता कार्यालयात बोलावले होते. त्यानुसार अनिल परब आज ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. गेल्या 6 तासांपासून अनिल परब यांची ईडीचे अधिकारी यांच्याकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते दुहेरी संकटात पाहायला मिळत आहे.

अनिल परब मागील समन्सला हजर राहिले नाही : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार आणि मंत्री नाराज आहेत. हे सगळे सुरतमध्ये गेले आहेत. एकीकडे पक्षात बंड उफाळून आलेले असताना दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब दापोली रिसाॅर्टप्रकरणी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. काल ईडीकडून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.

अनिल परब हजर राहणार नाहीत : अनिल परब दापोलीमधील रिसाॅर्ट प्रकरणातील कथित मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. याच प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने अनिल परब यांना गेल्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यावेळी अनिल परब यांनी मंत्री असल्याने पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे कळवले होते.

अनिल परब निवासस्थानी ईडीचे अधिकारी 12 तास : काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता. दरम्यान, अनिल परब आज चौकशीला उपस्थित राहणार का? याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी हे 12 तास ठाण मांडून होते.

महापालिका निवडणुकीच्या अडचणी वाढणार : अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अनिल परब हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेचे महत्त्वाचे रणनीतीकार समजले जातात. मुंबईतील वॉर्डमधील समीकरण अनिल परबांना चांगल्याच प्रकारे ठावूक आहे. त्यामुळे त्यांना तुरुंगात धाडल्यास शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ED Summons to Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचे समन्स; चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.