पुणे : शिवसेनेच्या अंतर्गत कलहामुळे राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनावर मालकी सिद्ध केली आणि ते कार्यालय ताब्यात घेतले. यामुळे शिंदे गटातील शिवसैनिकांनी बाळासाहेबांची शिवसेना ( Shiv Sena of Balasaheb ) यांचं कार्यालय मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही होत आहे. पुण्यातील सारसाबाग येथे शिंदे गटाचे आलिशान असे ' बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट ' शिवसेना भवन ( standing Shivsena bhavan in Sarsa Baug Pune ) उभे राहत आहे.
येणाऱ्या काही दिवसात काम पूर्ण - बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह घोषित होताच आता पुण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते नवीन कार्यालयाच्या कामाला लागले आहेत.पुण्यात मित्रमंडळ चौकात शिंदे गटाचा नवीन बाळासाहेबांची शिवसेना कार्यालय असणार आहे. याचे काम जोरात सुरू असून येत्या एक ते दीड महिन्यातच हे काम पूर्ण होईल, असे आश्वासन शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी यावेळी दिला आहे.
कार्यालय सर्वसामान्यांच्या हितासाठी - नव्या कार्यलयातून सरकारी कामे आणि लोकांच्या हितांच्या योजना व जनजागृती या ठिकाणाहून केली जाणार आहे. हे कार्यालय सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी असणार असल्याचे, शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी सांगितल आहे.